एक्स्प्लोर
पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणावर गुन्हा
किशोर रणदिवे असं या तरुणाचं नाव आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर रणदिवे असं या तरुणाचं नाव आहे. तो अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील राजापूरचा राहणारा आहे.
किशोर रणदिवेला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नातेवाईक अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आहेत. दोघे एकमेकांना ओळखत होते. किशोर रणदिवे रेश्माला लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत होता.
सुसाईड नोटमध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीने तसा उल्लेख केला होता. ही विद्यार्थिनी विद्यापीठात एमएस्सी च्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होती, तर किशोर रणदिवे हा गावाकडे ट्रॅक्टर चालवतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement