एक्स्प्लोर

Pune Crime News : 400 रुपयांची थाळी पडली 3 लाखांना; पुण्यात सायबर भामट्यांकडून लाखोंचा गंडा

'एकावर एक थाळी फ्री' देतो सांगत पुण्यातील एका खवय्याला प्रसिद्ध असलेली 400 रुपयांची सुकांता हॉटेलची थाळी 1 लाख 52 हजार रुपयांना तर दुसऱ्याला  3 लाख 34 हजाराला पडली आहे.

Pune Crime News : 'एकावर एक थाळी फ्री' देतो सांगत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दोन धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आले आहेत. पुण्यातील एका खवय्याला प्रसिद्ध असलेली 400 रुपयांची सुकांता हॉटेलची थाळी 1 लाख 52 हजार रुपयांना तर दुसऱ्याला 3 लाख 34 हजार रुपयांना पडली आहे. 'एकावर एक थाळी फ्री देतो' असं आमिष दाखवत खवय्येगिरीचा फायदा उठवत सायबर चोरांंकडून गंडा घातला गेला आहे. 

पुण्यातील कोरेगाव परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय सुशील कुमार खंडेलवाल यांना 1 लाख 52 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यांनी लगेच कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुशील कुमार खंडेलवाल इंजिनिअर आहेत. पुण्यातील कंपनीत ते कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीने ऑनलाईन सुकांता हॉटेलची जाहिरात बघितली. एका थाळीवर एक थाळी फ्री देणार अशी ती जाहिरात होती. त्या जाहिरातीवर फोन नंबर देखील देण्यात आला होता. त्या नंबरवर त्यांच्या पत्नीने फोन केला. त्यानंतर त्यांना झेडओएचओ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी ते अॅप डाऊनलोड केलं. 

ऑर्डर करण्यासाठीचे आणि पेमेंट करण्यासाठी लागणारे सर्व डिटेल्स त्यात भरले. क्रेडिट कार्डची माहिती देखील भरली. त्यानंतर काही वेळात त्यांना बॅंक खात्यातून 2 लाख 2 हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज आला. हे पैसे आमिष दाखवलेल्या आरोपीच्या खात्यात जमा झाले होते. त्यांनी लगेच पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी बॅंकेशी संपर्क साधला. त्यानुसार बॅंकेने कारवाई करत 50 हजार रुपये परत मिळवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दुसऱ्या घटनेत  4 लाख 86 लाख रुपयांचा गंडा
याच प्रकारची घटना पुन्हा एकदा घडली. पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या विनोद आचारी यांचीही सुकांता थाळीच्या नावाने फसवणूक करण्यात आली होती. त्यांच्या बॅंक खात्यातून 4 लाख 86 लाख रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाले. रक्कम महाराष्ट्रातील कोणत्या बॅंक खात्यात नाहीतर बिहार आणि ओरिसामधील बॅंकेत जमा झाली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली. 

विनोद यांच्या फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात आली होती. ती जाहिरात पेज व्ह्यू करत असताना त्यांना फोन आला आणि अॅप डाऊनलोड करण्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी प्रोसेस केली आणि पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा नंबर टाकला. त्यांच्या खात्यातून लगेच पैसे वजा होण्यास सुरुवात झाली. त्यांना पुन्हा फोन आला आणि काही वेळ थांबा जास्तीचे पैसे वजा होत आहेत, असं सांगितलं. त्यानंतर लगेच त्यांच्या खात्यातून 10 वेळा पैसे वजा झाले. त्यात 4 लाख 86 हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाले. त्यातील 1 लाख 34 हजार रुपये परत मिळले आहेत. त्यामुळे अशा कोणत्याच जाहिरातींवर विश्वास ठेवू नका, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
Video: मी आयुष्य पक्षात घालवलं, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुलेंचा कंठ दाटला, विक्रम काकडेंना उमेदवारी, पण सुनिल टिंगरेंही अर्ज भरला
Video: मी आयुष्य पक्षात घालवलं, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुलेंचा कंठ दाटला, विक्रम काकडेंना उमेदवारी, पण सुनिल टिंगरेंही अर्ज भरला
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
NCP Candidate Pune Vidhan Parishad Election 2026: पुण्यात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट; पार्थ पवारांचाच ठरला अंतिम शब्द, अजितदादांच्या निकटवर्तीयांना डावलले!
पुण्यात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट; पार्थ पवारांचाच ठरला अंतिम शब्द, अजितदादांच्या निकटवर्तीयांना डावलले!

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
Embed widget