Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
Suresh Dhas on Dhananjay Munde : सुरेश धस यांनी बोलताना बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून हल्लाबोल केला. बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर झाल्याची टीकाही त्यांनी केली.
Suresh Dhas on Dhananjay Munde : भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी विविध मागण्या संदर्भात चर्चा केली. यावेळी बोलताना वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांना सुद्धा कडक इशारा दिला आहे.
धनुभाऊ आपले विमान खाली आणा
यावेळी बोलताना सुरेश धस यांनी मुंडे यांना ओपन चॅलेंज देताना तोफ डागली. ते म्हणाले की, धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे. आमचा लेकरू मेलं त्याला नाय द्यायचा आहे. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही. मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. मुस्लिम लोकही सहभगी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री यांना टरबूज ही उपाधी सोशल मीडियाने दिली, पण काय झालं? आता मला ट्रोल करत आहेत. फेक अकाउंटवरून बोलले जात आहेत. दम असेल तर समोर येऊन बोला, असा इशाराही त्यांनी दिला.
या रगेलच्या नादी लागू नको
धस यांनी वाल्मिक कराड संबंधांवरूनही मुंडे यांना चॅलेंज दिले. ते म्हणाले की, माझे कसे संबंध कसे आहेत ते सांगा. मधुर आहेत की अमधुर आहेत. तुम्हीसुद्धा माझे मित्र होते. माझ्याकडे कागद आहेत, तारीखही सांगतो. कधीपासून ते माझे मित्र राहिले नाही, असा इशाराच त्यांनी दिला. आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. थर्मलमधूनजी राखेची गाडी निघते त्यावर कोणीतरी टोल वसूल करत आहेत. अमोल मिटकरी लहान आहे. तू कोणाच्या नादी लागतोय, या रगेलच्या नादी लागू नको. तुझं लय अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सुरेश धसांकडून गंभीर आरोप
सुरेश धस म्हणाले की, बीडमध्ये महादेव अॅपमध्ये देखील असाच प्रकार झाला असून एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. याची ईडी चौकशी व्हायला हवी होती. तेथे दोन अधिकारी होते, त्यांची नावे एसपींना सांगितल्याचे धस यांनी सांगितले. चांगले काम करणारे अधिकारी बाजूला काढल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचे धागे मलेशियापर्यंत गेले असल्याचे ते म्हणाले. महादेव अॅप संदर्भात सुद्धा आका असावा असेही त्यांनी सांगितले.
बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर
सुरेश धस यांनी बोलताना बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून हल्लाबोल केला. बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर झाल्याची टीकाही त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, बीडजवळ कोणी जमीन घेतली ते बघा. परळी बाजार समितीने गाळे बांधले त्याचे तीन वर्षांपासून लोकार्पण झालेलं नाही. ते गाळे गायराण जमिनीत उभारले आहेत. चौदाशे एकर आसपास गायरान जमीन आकाचे कार्यकर्ते तीनशे वीटभट्टी चालवत आहेत.. त्या ठिकाणी एकूण सहाशे वीटभट्टी आहे त्या ठिकाणी जे कॉम्प्लेक्स बांधले आहे त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले आहे. आका आता नवीन पॅटर्न वापरत आहेत त्यांनी तो आम्हाला सांगावा. आनंद चॅरिटेबल ट्रस्टला अडीच एकर जमीन मिळाली. परंतु, तिथं काहीही होऊ दिलं नाही. त्यामागे कोण आहे हे पहा असेही ते म्हणाले. आणखी खूप काही असून हळूहळू अनेक लोक पुढे येत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या