एक्स्प्लोर
पुण्यात ब्रेक फेल झालेल्या ट्रकची आठ वाहनांना धडक, 12 जखमी
धायरी भागातील दोन पुलांच्यामधला हा भाग अपघातांसाठी कुप्रसिद्ध बनलाय. या आधीही याच ठिकाणी अनेक अवजड वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत.

पुणे : पुण्यातील वडगाव धायरी भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने आठ वाहनांना उडवलं. ज्यामधे 12 व्यक्ती जखमी असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तामिळनाडूहून नारळ घेऊन मुंबईला निघालेला ट्रक धायरी भागातील नवले पुलावर आला असताना ही घटना घडली. ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि या ट्रकने समोरील वाहनांना धडका देण्यास सुरुवात केली. अखेर पुढच्या वडगाव धायरी पुलावर येऊन हा ट्रक थांबला. धायरी भागातील दोन पुलांच्यामधला हा भाग अपघातांसाठी कुप्रसिद्ध बनलाय. या आधीही याच ठिकाणी अनेक अवजड वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका टँकरचं ब्रेक फेल झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर त्या आधी एका डंपरचं ब्रेक फेल झाल्याने पाच जणांचा याच ठिकाणी मृत्यू झाला होता.
आणखी वाचा























