Pune Crime News: लग्नाला प्रतिसाद न दिल्याने दौंडमध्ये तरुणीवर ब्लेडने हल्ला; आरोपी अटकेत
लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका सतरा वर्षीय मुलीच्या गळ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील मळदमध्ये घडली आहे.

Pune Crime News: लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका सतरा वर्षीय मुलीच्या गळ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील मळदमध्ये घडली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभनजवळील पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात ही घटना घडली. या प्रकरणी राहुल श्रीशैल निरजे याला ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
राहुल निरजे हा संबंधित युवतीवर प्रेम करत होता. या युवतीशी लग्न व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र संबंधित युवतीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. या दरम्यान, त्याने या युवतीला शेतात गाठून तिच्या अंगावर ब्लेडने वार केले. त्यात तिच्या गळ्यावर देखील आरोपीने वार केलेत. यात युवती जखमी झाली आहे. तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर राहुल निरजे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लग्नाचं अमिष दाखवून केला अत्याचार
यापुर्वी अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. पहिला विवाह झाला असताना 28 वर्षीय तरुणीला विवाहाचं अमिष दाखवून तिच्यावर अत्याच्यार केला होता. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसराती पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत 28 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली होती. यावरुन आरोपीला अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तरुणी पुण्याची रहिवासी असून आरोपी हा मध्यप्रदेशचा रहिवासी होता. आरोपीने आणि तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरुन झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीचा आधीच एक विवाह झाला असताना देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर अनेक दिवस दोघे सोबत राहिले. तरुणीच्या घरी देखील आरोपीची कायम ये-जा असायची शिवाय घरी, गोवा, मुंबईत देखील दोघे फिरायला गेले असता तिच्यावर बलात्कार केल्याचं तरुणीने सांगितलं आहे. तरुणीवर जबरदस्ती करुन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. विवाह न करता तरुणीची फसवणुक केली, असं तक्रारीत लिहिले आहे. विवाह करणार असं सांगून तिच्यावर बलात्कार केला.























