एक्स्प्लोर

Pune Bypoll Election 2023 : कसब्यातील भाजपच्या पराभवाला कोण जबाबदार? संजय काकडे म्हणाले... 

Pune Bypoll Election 2023 : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाला भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्वत:ला जबाबदार धरले आहे.

Pune Bypoll Election 2023 : मागील चाळीस वर्षे अबाधित असलेला भाजपचा कसब्याचा गढ काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांच्या विजयाने कोसळला आहे.  त्यानंतर भाजपच्या या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी या पराभवाला आपल्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) आणि पुण्यातील भाजपचे नेतृत्व जबाबदार असल्याचे म्हणत पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीय. त्यामुळे लवकरच पुणे भाजपमधे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणात कितीही बदल झाले तरी मागील चाळीस वर्ष कसबा पेठ मतदारसंघावर भाजपचा झेंडा कायम होता. मात्र, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पहात असताना यावेळेस कॉंग्रेसच्या रविंद्र यांनी भाजपकडून कसबा हिसकावून घेतला. भाजपच्या या धक्कादायक पराभावानंतर पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्‍यता आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी या पराभवास आपल्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे भाजपचं नेतृत्व करणारे नेते जबाबदार असल्याचं म्हटलय. परंतु, भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी या पराभवाला आपला पक्ष जबाबदार नसून आपणच कमी पडल्याचं म्हटलं आहे. 
 
हेमंत रासने यांच्यावर पराभवाची जबाबदारी ढकलून चालणार नाही याची भाजपच्या नेतृत्वाला पुरेपुर कल्पना असल्याचं बोलंलं जातंय. कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे 16 नगरसेवक असताना देखील हेमंत रासने कुठेही आघाडी घेऊ शकले नाहीत. पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे भाजपचे सर्वच नेते या निवडणुकीत अपयशी ठरले आहेत. मात्र सर्वात मोठी जबाबदारी होती ती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे देखील अपयशी ठरल्याचं  संजय काकडेंनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र या पराभवाचं आत्मचिंतन करु असं म्हणत वेळ मारून नेहली आहे. 

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात निर्माण झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजपची ज्या वेगाने वाढ झाली त्याचपद्धतीने पुण्यातही भाजप वाढला. पण समोर तगडा उमेदवार असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी स्थानिक नेतृत्व देखील तेवेढच सक्षम हवं याची जाणीव भाजपला कसब्याच्या निकालाने झालीय. त्यामुळेच पुणे भाजपमधे लवकरच मोठे फेरबदल होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. 

महत्वाच्या बातम्या 

Pune Bypoll Election 2023: मविआची डोकेदुखी वाढवणारे बंडखोर राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM Headlines at 12PM 28 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Beed Police: बीडमध्ये पोलिसांसाठी आदेश, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची; पोलीस अधीक्षक नवनीत कावतांनी फर्मान सोडलं
बीडमधील जातीयवादाला SP कावतांचा सुरुंग, आडनाव घ्यायचं नाही, एकमेकांना नावाने हाक मारा, पोलिसांना आदेश
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
Embed widget