Pune : पुण्यात सत्ताधारी-विरोधकांकडून एकमेकांच्या कारभाराची होळी, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
Pune News Update : पुण्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांच्या कारभाराची होळी करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.
Pune News Update : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात केंद्र सरकारच्या आणि पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीने पंतप्रधान मोदींच्या नावाने बोंब मारली. राष्ट्रवादी काँग्रेस नंतर पुणे शहर भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"सर्व वाईट प्रवृत्ती जाळण्याचे प्रतीक म्हणजे होळी आहे. हे सरकार सामान्य माणसांवर अन्याय करत आहे. सरकारला आमदारांचा निधी वाढवण्यासाठी, ड्रायव्हरचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत. परंतु, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत. एसटी कामगारांचा विषय सुटत नाही, महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत. त्यामुळे या सर्व वाईट प्रवृत्तीची होळी आज पुण्यातील भाजप कार्यालयात करण्यात आली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "द काश्मीर फाईलसमध्ये जे भयाण चित्र दाखवण्यात आलं आहे, ती वस्तुस्थिती नाहीय का? हे एकदा मान्य करा. काश्मीर मधील हिंदू माणूस काश्मीर सोडन पळून नाही का गेला? काश्मीरमधील महिलांवर बलात्कार झाले नाहीत का? काश्मीरमधील पंडितांची संपत्ती हडप केली नाही काय? देशाचा इतिहास दाखवायला हवा. आम्ही लोकांना तो सिनेमा दाखवू. फार काळ सत्य दाबून ठेऊ शकत नाही."
महत्वाच्या बातम्या
- बिबट सफारी अर्थमंत्र्यांच्या बारामतीतच, वनविभागाकडून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, सफारी पुन्हा जुन्नरला आणा
- The Kashmir Files : 'तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका'; कंगनाचा व्हिडीओ व्हायरल
- Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांना बेघर करणारा क्रूर बिट्टा कराटे, चिन्मय मांडलेकरने साकारलेले पात्र पाहून अंगावर शहारे