एक्स्प्लोर
पिंपरीत मतदानापूर्वीच भाजपने खातं उघडलं, रवी लांडगे बिनविरोध
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मतदानापूर्वीच भाजपाने एक जागा बिनविरोध काढून खातं उघडलं आहे. प्रभाग 6-क मधील भाजप उमेदवार रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आल्याच निश्चित झालं आहे.
भाजप उमेदवार रवी लांडगे यांच्या विजयाची आता केवळ याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी अर्ज भरला नव्हता. त्यामुळं लांडगेंसह दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिले होते. पैकी एका अपक्ष उमेदवाराने काल अर्ज मागे घेतला होता. दुसरा अपक्ष उमेदवार योगेश लांडगेला भाजपाने आज गळ्याला लावत खात उघडलं.
भोसरीचे आमदार आणि ग्रामस्थ यांनी यासाठी मध्यस्थी करत हा तोडगा काढला. यासाठी योगेश यांना भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर एक पद देण्याचं निश्चित झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement