Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड महापालिकेत बिहार पॅटर्न? महिलांना 10 हजार वाटण्यासाठी इच्छूक उमेदवाराला हवंय 30 कोटीचं कर्ज, थेट वर्ल्ड बँकेकडे अर्ज केला
Pimpri-Chinchwad: मी जे काही कर्ज मागितल आहे ते माझ्या प्रभागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ते पैसे मागितलेले आहेत, असंही त्या इच्छूक उमेदवाराने म्हटलंय.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आगामी निवडणुकीत बिहार पॅटर्न राबवण्यासाठी एका इच्छुक उमेदवाराला (Pimpri Chinchwad Municipal Corporation) तब्बल तीस कोटीचं कर्ज हवं आहे. शरद पवार गटाच्या माधव पाटलांनी थेट वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक सतरा मधील तीस हजार महिलांना प्रत्येकी दहा हजार एक रुपयांचं वाटप करण्यासाठी माधव पाटलांना हे कर्ज हवं आहे. मला नोट देऊन वोट घ्यायचं नाही अन असं निवडून ही यायचं नाही. तर महिलांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा हेतू आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी मला हे तीस कोटीचं कर्ज हवं असल्यानं, वर्ल्ड बँक मला नक्की कर्ज देईल, असा अंध विश्वास ही माधव पाटलांना आहे. आता वर्ल्ड बँक माधव पाटलांना कर्ज देईल का? हा चर्चेचा विषय ठरु शकतो, पण या मागणीद्वारे महायुती सरकारला उपरोधिक सल्ला देण्याचा प्रयत्न ते करतायेत. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
Pimpri-Chinchwad: माझ्या प्रभागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ते पैसे
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार माधव पाटील यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की, मी जे काही कर्ज मागितल आहे ते माझ्या प्रभागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ते पैसे मागितलेले आहेत आणि मला असं वाटतं की आपण ज्यावेळी पैसे मागतो त्यावेळी त्याचं इम्पॅक्ट अनालिसिस झाला पाहिजे, तुम्ही पाहिले असेल आता महाराष्ट्राची निवडणूक झाली, बिहारची निवडणूक झाली, उत्तर प्रदेशची झाली, त्या त्या सरकारने महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले, तुम्ही जरी म्हणत असाल की निवडणूक जवळ आलेली आहे. पण माझं एकच टार्गेट आहे महिलांचा सक्षमीकरण झालं पाहिजे, म्हणजे मी महिला बचत गट हा शब्द खूप ऐकतो पण आता महिला बचत गट याचं नाव वुमन बिझनेस ग्रुप असं केलं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या जे काही आस्थापने आहेत, शाळा, कॉलेज, गार्डन, हॉस्पिटल त्याच्यामध्ये प्रत्येकी दोन महिलांना उत्पादित केलेल्या वस्तू विकण्यासाठी मुभा दिली पाहिजे असंही त्यांनी म्हटले आहे.
Pimpri-Chinchwad: पैसे देणं चुकीचं आहे, वोट साठी नोट देणं...
बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीआधी महिलांना दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. त्याचीच किनार तुम्ही या निवडणुकीत पकडली आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले पैसे देणं चुकीचं आहे, वोट साठी नोट देणं एकदम चुकीचं आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं आहे, पैसे दिल्यामुळे बिहारमध्ये एनडी सरकार आलेलं आहे. मी पैसे वाटण्याच्या विरोधातच आहे, मला एक मॉडेल असा सेट करून दाखवायचा आहे की, प्रभागामध्ये मिळालेले पैसे व्यवस्थित वापरले तर महिलांची उन्नती होईल त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यांचे कुटुंब आनंदी राहील.
हे आमिष अजिबात नाही, आपण किती वेळा जुन्या गोष्टींसाठी म्हणायचं, कधीतरी त्या कुटुंबासाठी वेगळं आपण का करत नाही, म्हणजे गेल्या तीन महिन्यांमध्ये 400 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्या चारशे शेतकऱ्यांच्या घरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गेले नाहीत का. गेले असतील, पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर फक्त महिला सक्षमीकरण असं ध्येय पण ठेवलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे हे अमिष नाही. मतदारांनी काय मागायचं वॉटर, मीटर, गटर यासाठी नका भांडू, आम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे त्याच्यासाठी मी हे पाऊल उचलले आहे,असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
वर्ल्ड बँकेकडे पैशांच्या बदल्यात गहाण ठेवायला माझ्याकडे काहीही नाही. माझं शिक्षण त्यासाठी बास आहे, मी जे काही पत्र लिहिलेले आहे त्याला बॅकअप असा आहे की जागतिक बँकेने खेडोपाडी, भारतभर भरपूर लोन दिलेलं आहे. भारत सरकारच्या अनेक कामांसाठी मदत केली आहे. मी याच भारताचा एक नागरिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, मी बँकेकडे कर्ज मागू शकतो आणि मी त्यांना सांगितलं आहे की मी त्यांना लोन आणि त्याचा इंटरेस्ट परत करणार आहे त्यामुळे ते मला लोन देतील असं नक्की वाटतं, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.






















