एक्स्प्लोर

Ajit Pawar: गड्यानो फोटो काढताना लक्ष ठेवा! वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोवरून अजित पवारांचा सल्ला, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar on Walmik karad Photo: कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी, असा सल्ला देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना दिला आहे.

बारामती: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हत्या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत आहेत, तर आरोपींसोबत संबंध असलेल्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडला लक्ष्य केलं जात असून त्याच्यासोबत चांगले संबंध असलेल्या धनंजय मुंडेंनाही (Dhananjay Munde)  लक्ष्य केले जात आहे. अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर  (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले आहेत. तर सर्वत्र धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांच्यासह वाल्मिक कराडचे (Walmik Karad) फोटो असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठं भाष्य केलं आहे. 

अजित पवार (Ajit Pawar)  हे पणदरे येथील नर्मदा किसन ऍग्रो उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले, अलीकडे गर्दी वाढत आहे, सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो, पण फोटो नाय काढून दिला तरी नाराज होतात, आणि गडी बदलला असं म्हणतात,आणि अशातच एखादा नवीन गडी येतो फोटो काढून जातो आणि वाटच लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी, असा सल्ला देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना दिला आहे.

कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून दादांचा सल्ला

वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती दौऱ्यात एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. गड्यांनो, आमच्यासोबत कोण फोटो घेतोय याची काळजी घ्या, असे आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अजित पवार (Ajit Pawar) बोलताना म्हणाले, आपले फोटो कार्यक्रमात कोणासोबतही काढले जातात. परंतु, काही वेळा याची किंमत मोजावी लागते. अलीकडे गर्दी वाढत आहे. सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण, फोटो नाही काढू दिला, तर नाराजी होते अन् गडी बदलला, असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि पुढे वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतोय, याची आम्हाला कल्पना द्यावी, असं म्हणत स्पष्ट शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती देण्याचं आवाहन केलंय.

दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना...

अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केलं आहे. सध्या राजकारण काय चाललंय ते पाहा. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो. सगळं आकरीतच घडत आहे. त्यामुळे यदाकदाचित कोणा चुकीच्या माणसाचा फोटो माझ्यासोबत काढला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे, असे मी सांगेन. मी पोलिसांनाही सांगितले आहे की, कार्यक्रमात असे कोणी फोटो काढत असतील, त्यावर लक्ष द्या. दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget