Supriya Sule On Ajit Pawar : अजित दादांची ओळखच कणखर विरोधी पक्षनेता होती पण आता...;सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका
अजित पवारांकडे राज्य कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून पाहत होतं. आता जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीत. आताच्या अजित पवारांचे भाषणं ऐकले की आश्चर्य वाटतं,अशी टीका सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर केली आहे.
पुणे : अजित पवारांकडे (Ajit Pawar) राज्य कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून पाहत होतं. आता जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीत. आताच्या अजित पवारांचे भाषणं ऐकले की आश्चर्य वाटतं,अशी टीका सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवारांवर केली आहे. त्या आज पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यातील खडकवासला मतदारसंघात येण्याऱ्या काही परिसरात प्रचार करत आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मिळून पवार साहेबांना संपवायचा आहे. चंद्रकांत पाटील बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी हे बोलून दाखवलं होतं. हे सगळं पवार साहेबांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरु आहे. महायुतीकजून जी कृती केली जात आहे. त्याने शरद पवारांना त्रास द्यायचा आहे, हे सिद्ध होत आहे. शरद पवारांना संपवायचं आहे. हाच अजेंडा घेऊन विरोधक कामाला लागले आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी शरद पवारांवर केला आहे.
माझ्या बायकोला निवडून द्या सगळी काम करतो, अशी विधानं अजित पवार सातत्यानं करताना दिसत आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, कदाचित बहिणीच प्रेम कमी पडल असेल. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश मग राज्य मग पक्ष मग नाती. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आहे. दादा असं बोलतात याचा मला आश्चर्य वाटतं. आमच्याशी घटस्फोट होऊन सात महिने झाले. अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं आहे.
राज्यात पाण्याची परिस्थिती गंभीर
आपल्या मतदारसंघासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात नागरिकांशी माझा सतत संवाद असतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी मला माहिती आहे. मी कायम वारजेमध्ये येते. जेव्हा पासून खासदार आहे. तेव्हापासून प्रत्येक मतदारसंघात मी दौरे करते. पुण्यासह राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुणे पालिकेच्या निष्क्रिय कामामुळे पुण्यातील पाणी, कचरा, ट्रॅफिक प्रश्न सुटले नाही. भाजपची एक हाती सत्ता असूनही काम नाही, हे त्यांचं अपयश आहे. पाण्याची परिस्थिती सगळेच भोगत आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Manoj Jarange: पाडण्यातही आपला विजय, मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा : मनोज जरांगे