Madha Lok Sabha: शिंदे सेनेला शरद पवारांचा दे धक्का, करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. मात्र त्यांनी लोकसभेच्या रणधुमाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर : माढा लोकसभा (Madha Lok Sabha Election) मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) सातत्याने महायुतीला जोरदार झटके देत आहे. शिवसेना शिंदे गटाचा माजी आमदाराला पक्षात घेत पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना धक्का दिला आहे . करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत .माजी आमदार नारायण पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे . नारायण पाटील यांच्या समवेत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती ,माजी पंचायत समीती सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य , गावोगावचे सरपंच यांच्या सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांचा प्रवेश होणार आहेय यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभेच्या रणधुमाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1999 ला नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून करमाळा विधानसभा मतदारसंघातून उभे होते. 2009 झाली त्यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली होती तर 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत ते आमदार झाले. माजी आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुक्यातील वजनदार नेते आहेत. सन 2019 ला शिवसेनेने उमेदवारी आयत्या वेळी कट केल्यावर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवुनही त्यांना मोठे मतदान मिळाले होते . शिवसेनेने उमेदवारी नाकारली तरी देखील ते शिवसेनेतच होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. मात्र त्यांनी लोकसभेच्या रणधुमाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेला संजय मामा वि. नारायण पाटील लढत होण्याची शक्यता
करमाळा विधानसभेची जागा महायुतीमधील अजित पवार गटाकडे जाणार असल्याने नारायण पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार जाण्याशिवाय पर्याय नव्हता . सध्या करमाळा येथे अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे हे आमदार असून नारायण पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत . गेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील हे महायुतीकडे होते तेव्हा या मतदारसंघातून संजय शिंदे यांनी 35 हजाराचे मताधिक्य घेतले होते . आता यावेळी करमाळा मतदारसंघात आमदार संजय मामा महायुतीकडे आहेत तर महायुतीतील माजी आमदार नारायण पाटील आज शरद पवार यांचे गटात असणार आहेत.
हे ही वाचा :