एक्स्प्लोर

Indrayani Kundmala bridge collapse: हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले! कुंडमळा दुर्घटनेवेळी नेमकं काय घडलं?

Indrayani Kundmala bridge collapse: पुलावरच्या गर्दीत अनेकजण अडकले. त्यांचा प्रचंड भार पुलावर आल्यामुळं काही क्षणातच पूल कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं.

पवनानगर (जि. पुणे): रविवारी पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर कुंडमळा (ता. मावळ) येथे भीषण दुर्घटना (Kundamala bridge collapse) घडली. इंद्रायणी नदीवरील जुना साकव पूल कोसळून चार जणांचा मृत्यू, तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याने आणि त्यामध्ये दुचाकीस्वारांनीही प्रवेश केल्याने पूल ताण सहन न करताच कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पुलाच्या दोन्ही बाजूंनी दुचाकीस्वार पर्यटकांनी हुल्लडबाजी करत प्रवेश केला. त्यावेळी पुलावरच्या गर्दीत अनेकजण अडकले. त्यांचा प्रचंड भार पुलावर आल्यामुळं काही क्षणातच पूल कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. (Kundamala bridge collapse) 

रविवार असल्याने या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमले होते. गर्दीने निर्माण झालेल्या भारामुळे पूल दगडांवर व काही भाग थेट पाण्यात कोसळला. अपघातानंतर अनेकजण पाण्यात अडकले, काहींना गंभीर दुखापती झाल्या. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

दुर्घटनेपूर्वीचा फोटो व्हायरल

दुर्घटनेच्या काही वेळ आधीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात पुलावर प्रचंड गर्दी दिसून येते. यावरूनच गर्दीमुळे पूल कोसळल्याचे स्पष्ट होते, पुलावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक दिसून येत होते.

ड्रोनच्या मदतीने सुरू आहे शोधमोहीम

रविवारी रात्री उशिरापर्यंत NDRF व स्थानिक बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू होते. सोमवारी सकाळपासून ड्रोनच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत चार मृतदेह हाती लागले असून, एकूण 51 जण जखमी असल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तीन जणांना वाचवले, तर एक जण बचावपथकांनी बाहेर काढला.

लोखंडी सांगाडा अडथळा बनला

पूल कोसळल्यानंतर त्याचा लोखंडी सांगाडा नदीत खोलवर अडकला होता. पाण्याचा प्रवाह व सततचा पाऊस यामुळे सांगाडा बाहेर काढण्यात अडथळे येत होते. सध्या काही भाग कटरच्या साह्याने कापण्यात आला असून पाऊस थांबल्यावर उर्वरित सांगाडा हटवण्यात येणार आहे.

सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांनी बॅरिकेड्स लावून परिसर सील केला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे, राखीव पोलिस दल, तसेच रायगड आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी तैनात आहेत. मनाई आदेशाची अंमलबजावणीही सुरू असून नागरिकांना अपील करण्यात आले आहे की, ते या भागात गर्दी करू नये.

सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी

रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. 100 ते 150 पर्यटक पुलावर उभे होते. त्याचवेळी पूल मधोमध तुटून कोसळला, आणि अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आरडाओरडा, घबराटीचे वातावरण निर्माण झाले. काही स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उड्या टाकून काही पर्यटकांचे प्राण वाचवले. तत्काळ तळेगाव पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग, बचाव पथके व स्वयंसेवी संस्था घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदतकार्य सुरू केले. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget