Pune Crime News : धक्कादायक! येशूची पूजा करा म्हणत आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न
Pune Crime news : आळंदीमध्ये काही जणांना धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime news : आळंदीमध्ये काही जणांना (pune crime) धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा करा असं सांगत तुम्ही येशूचे रक्त प्या पूजा करा, असं करायला सांगितल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकरणी सुधाकर सुर्यवंशी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, तक्रारदार पाच वर्षापासून स्मशानभूमीत काम करतात. तक्रारदार घरात असताना तीन व्यक्ती त्यांच्या घरात शिरल्या. त्यांनी तक्रारदार आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला. तुमचे सगळे आजार ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने बरे करतो असं सांगितलं. घरातील सर्व देव टाकून द्या त्यानंतर तुमच्या जीवनातील सगळे आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी येशू ख्रिस्तांची पूजा करायला सांगितलं. मातंग धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आग्रह केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.
तुमचे देव फेकून द्या. मातंग समाजाचे देव भंगार आहे. तुमचे देव टाकून दिले तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही. असं म्हणत त्यांनी येशूचं रक्त म्हणून अनेकांना द्राक्षाचं पाणी पाजल्याचा प्रकारही केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. आम्ही तुम्हाला आजारांपासून बरं करु. येशू ख्रिस्तांकडे चांगले मंत्र आहेत. आमच्या प्रार्थना श्रेष्ठ आहे, असं सांगून तक्रारदार आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना मानसिक त्रास दिला आहे. त्यासोबतच मातंग धर्माचा अपप्रचारही केला आहे. त्यावेळी हा प्रकार कोण करत आहे, याची खात्री तक्रारदारांनी केली. सुधाकर सुर्यवंशीने हा प्रकार केल्याचं उघड झालं. त्यांनंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
द्राक्षाचं पाणी रक्त म्हणून पाजलं
या मातंग समाजातील लोकांना ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर त्यांना मानसिक त्रास दिला. देव फेकून देण्यासाठी सांगितलं. देवांचाही अपमान केला. त्यावेळी नागरिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी द्राक्षाचं लाल पाणी आणून मातंग समाजातील लोकांना येशूचं रक्त असल्याचं सांगून पाजण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मातंग समाजातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
VIDEO : Pune-Pimpri : पिंपरी-आळंदीमध्ये काही जणांचा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न, 3 जणांवर गुन्हा दाखल
सविस्तर बातमी थोड्या वेळात...