एक्स्प्लोर

Pune Drugs Video : पुण्यात ड्रग्जवरुन पुन्हा राडा, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, शंभूराज देसाईंकडून प्रत्युत्तर

Pune Drugs News :  पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय.

Pune Drugs News :  पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायाचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखी एक प्रकार समोर आलाय. यामुळे सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. 

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलेय. मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं दिसतेय. 

रवींद्र धंगेकर काय म्हणाले ? 

या प्रकरणाचा पाठपुरावा मी गेल्या काही दिवसांपासून घेत आहे. पोलीस आणि इतरांशी माझं पत्रव्यवहार आणि बोलणं झालं. पोलीस पथकातील काही अधिकार्‍यांमुळे या घटना घडत आहेत. पोलिसांना पैसे देऊन हा प्रकार होत आहे. यावर कायमचा उपाय शोधायला हवा. तसा कायदा तयार करायला हवा. 

पोलिसांना पैसे देऊन काही प्रकऱणं मिटवली जातात. पुन्हा तेच सुरु होतं. कायदा आहे, पण पोलिस त्याचा वापर करत नाहीत, पैशांचा हप्ता घेऊन सर्व काही सुरु आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. ललीत पाटील प्रकरणात कोट्यवधींचा ड्रग्ज पुण्यात सापडलं. पोलिसांची बदनामी झाली. तरी पोलीस सुधारले नाहीत. या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांचं अडणाव देसाई चुकून झालं, त्यांचं अडनाव खाटीक असायलं हवा. त्यांच्यावर आरोप केल्यावर हक्कभंग आणणार असल्याचं सांगितलं जातं. 

राजपूत नावाचा पोलीस महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहचात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो. राजपूत यांच्यावर इतके आरोप झाले तर त्यांना नोटीसही दिली नाही. त्यांची घरं चालवण्याचं काम राजपूत सारखे अधिकारी करताता. त्यांच्यावर इतके आरोप झाले तरीही त्यांना नोटीस जात नाही. पुण्यातील नागरिकांना, तरुणांना व्यसनाधिन केले जातेय, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. 

सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, शंभूराज देसाईंना फैलावर घेतलं - 

तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून पुण्यातल्या ड्रग्ज  प्रकरणावर सातत्याने भूमिका मांडतेय. त्याही वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला  लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई आरेरावीने बोलतात, त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय,  हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे.   या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. महाराष्ट्रातील ड्रग्जचा विळखा त्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही.  त्यामुळे माझी मागणी आहे की शंभूराजेंनी राजीनामा द्यावा आणि एक्साइस अधिकारी राजपूत यांचं निलंबन व्हावं. 

शंभूराज देसाई काय म्हणाले ?

याप्रकरणी आम्ही पोलिस आणि आमच्या खात्यासंदर्भात चौकशी करु.. तुमच्या वाहिनीमार्फतच मला माहिती मिळाली. कल्याणीनगर प्रकरणानंतर आम्ही सर्व हॉटेल आणि पब यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यत जवळपास 60  जणांवर कारवाई केली. हा व्हिडीओ कुठल्या भागातील आहे, त्याची आम्ही चौकशी करणार आहे. 49 बार आणि पब बंद केलेली अजून सुरु केलेली नाहीत, असे शंभूराज देसाई म्हणाले. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, ज्या परिसरातील हॉटेलमध्ये हे घडलेय त्याबाबत कसून चौकशी करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितलेय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget