Sasoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली माझी दोन्ही मुलं...
माझ्या दोन्ही मुलांशी मागील तीन-चार वर्षांपासून आमचे कोणतेही संबंध नव्हते, अशी प्रतिक्रिया ललितच्या आईने दिली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालातून पळून गेल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून (Sasoon Hospital Drug Racket)रुग्णालातून पळून गेल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता राजकीय नेत्यांनीदेखील या प्रकरणात उडी घेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहे. अशातच ललित पाटीच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्या दोन्ही मुलांशी मागील तीन-चार वर्षांपासून आमचे कोणतेही संबंध नव्हते, अशी प्रतिक्रिया ललितच्या आईने दिली आहे.
पुढे बोलताना ललित पाटीलची आई म्हणाली की, ललित हा मागील काही वर्षांपासून आमच्या संपर्कात नव्हता सोबतच भूषणदेखील तीन चार वर्षांपासून कुठे होता याची काहीही माहिती नाही. माझी मुलं ड्रग्ज प्रकरणात आहेत आणि त्यांचा या सगळ्यात सहभाग आहे, याची माहिती आम्हाला बातम्यामधून समजली आहे.
ललित आणि भूषण माझे दोन्ही मुलं ड्रग्जचं काम करतात हे ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. यांच्या वडिलांना जास्त धक्का बसला आहे. त्यांची तब्येत खराब झाली असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु असल्याचं ललित पाटीलच्या आईने सांगितलं आहे.
ललित पटील ससूनमधून फरार झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याच ड्रग्ज रॅकेटमध्ये ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलदेखील असल्याचं समोर आलं. त्यानंतर काल (10 सप्टेंबर) भूषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. काल रात्री उशीरा दोघांना विमानाने पुण्यात आणलं आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
तिघे मिळून चालवायचे ड्रग्ज रॅकेट
ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा केमिकल इंजिनिअर आहे. हा भूषण मेफेड्रोन ड्रग्स तयार करायचा आणि अभिषेक बलकवडे या मेफेड्रोन ड्रग्सची वाहतूक करत होता. योग्य स्थळी नेऊन पोहचवत होता. त्यानंतर ललित पाटील या मेफेड्रोन ड्रग्सची डिल करत होता. या तिंघांची साखळी अनेकांपर्यंत मेफेड्रोन पोहचवत होतं. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून ललित पाटीलचा शोध पुणे पोलीस घेत आहे.
राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप...
या ललित पाटी प्रकरणी आता राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या नेत्याचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप केला आहे तर नाशिकमधील ललित पाटील याचे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शिंदे गटाकडून व्हायरल केले जात आहे. त्यासोबतच या फोटोची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे.
इतर महत्वाची बातमी-