एक्स्प्लोर

Pune Rain Update: घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत ठेवा! पुण्याला पावसाचा अलर्ट जारी, काही भागात पावसाला सुरूवात

Pune Rain Update: पुण्यात आज हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. काही भागात पावसाला सुरूवात देखील झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणारा पुणे दौरा देखील पावसामुळे रद्द झाला आहे.

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे, अशातच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा पुणे दौरा देखील पावसामुळे रद्द झाल्याची माहिती आहे. पुणे शहर परिसरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. काल(बुधवारी) दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली, काही वेळ झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती, आज देखील पुण्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain in Pune) शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 

पुण्यासह या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा

आज, 26 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहराला पावसाचा अलर्ट (Pune Heavy Rain) देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा तसेच कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात आज संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

हवामान विभागाने वर्तवलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ आणि विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा आजचा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit)  करण्यात आला आहे. आज मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र  मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधानांचा दौरा करण्यात आला आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्दा झाला आहे. येत्या काही तासांमध्ये पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. पावसाचा फटका मोदींच्या दौऱ्याला देखील बसला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAhmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषणMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
Embed widget