एक्स्प्लोर

Pune Nikhil wagle Attack : पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमादरम्यान गदारोळ; निखिल वागळे, आयोजकांसह 200 ते 250 जणांवर गुन्हे दाखल

पुणे : पत्रकार निखिल वागळेच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह 43  आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला. या प्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह (dhiraj ghate) 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल (FIR) झाल्यानंतर आता निर्भय बनो (Nirbhay Bano) या कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 फेब्रुवारीला राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी निखिल वागळे (Nikhil Wagle) येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला केला. निखिल वागळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला केला. 

या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहे. पहिला गुन्हा हा आंदोलनकर्ते आणि गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे तर दुसरा गुन्हा आयोजक, निखिल वागळे, महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलात निर्भया बनो या कार्यक्रमस्थळाजवळ जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाचं उल्लंघन करुन हे सगळे कार्यकर्ते सभास्थळी जमले होते. त्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीफोड केली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. तर महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी दोघेही आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. परिणामी मोठा गदारोळ झाला. पोलिसांच्या आदेशाचं आणि जमावबंदीचं उल्लंघन केल्याने या सगळ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

पोलिस बंदोबंदास्त प्रवास होत असतानाही गाडी चारही बाजूने फोडली

भाजपकडून होत असलेल्या कडाडून विरोधानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी निर्भय बनो कार्यक्रमाासाठी आलेल्या नागरिकांनी वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये काही तरुणीसुद्धा जखमी झाल्या  आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात वागळे यांच्या  अंगावरही शाई फेकली. पोलिस बंदोबंदास्त प्रवास होत असतानाही गाडी चारी बाजूने फोडण्यात आली आहे.  भाजपकडून विरोध केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वागळे यांचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा घेतला. वीटा सुद्धा फेकून मारण्यात आला, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. कपडे फाडण्याचा सुद्धा प्रयत्न  करण्यात आल्याचा आरोप काही महिलांनी केला. 

या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला होता. सभास्थळी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात येत होती. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. निखिल वागळे यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे भाजप आक्रमक झालं आणि त्यांनी निखिल वागळेंना विरोध केला. 

इतर महत्वाची बातमी-

BJP workers Attack on Nikhil Wagle : पुण्यातील निखिल वागळे गाडी तोडफोड प्रकरण; भाजप शहराध्यक्षासह 43 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget