Murlidhar Mohol Pmc Banner : 'आता बास झालं, तुला नक्की पाडणार'! मोहोळ अण्णांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच पुण्यात बॅनरबाजी
भाजपकडूनच मुरलीधर मोहोळांविरोधात महापालिकेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. स्टॅंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं आता तुला पाडणार, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
पुणे : पुण्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा होत्या मात्र आता एका बॅनरमुळे ही धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता भाजपकडूनच मोहोळांविरोधात महापालिकेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. स्टॅंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं आता तुला पाडणार, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. बॅनरबाजी दिसल्यारवर महापालिकेकडून हा बॅनर लगेच हटवण्यात आला आहे.
बॅनरमध्ये नक्की काय लिहिलंय?
स्टॅंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं...
आता खासदारकी पण ?
आता बास झालं तुला नक्की पडणार
कष्टाळू भाजप कार्यकर्ते
मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीला विरोध
सध्या सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारीच्या चर्चा रंगताना दिसत आहे. त्यातच पुणे लोकसभेसाठी इच्छूकांची रांग लागली आहे. त्यात अनेक भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची रांग आहे. मात्र यातच भाजपने जाहीर केलेल्या संभाव्य यादीत मुरलीधर मोहोळांचं नाव दिसत आहे. त्यामुळे भाजपचे बाकी इच्छूक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असल्याचं या बॅनरमधून दिसत आहे. स्टॅंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं,आता खासदारकी पण? आता बास झालं तुला नक्की पडणार, असं बॅनर लावून भाजपच्या कार्यकर्त्यांनीच मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मागील काही दिवसांपासून पुणे भाजपमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक कार्यक्रमात ही धूसफूस दिसून आली होती. त्यातच भाजपतील नेत्यांमध्येच इव्हेंट वॉरदेखील बघायला मिळाला होता. मात्र हा वाद यापूर्वी उघडपणे समोर आला नव्हता. आता मात्र थेट महापालिकेत बॅनरबाजी करत हा वाद भाजपच्याच कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. या बॅनरची माहिती मिळताच महापालिकेकडून हे बॅनर हटवण्यात आलं आहे.
कोण आहे मुरलीधर मोहोळ?
-पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत
-2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.
-उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद
-पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018
-संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) -2017-2018
-संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) 2017-2018
- सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018
-2009 मध्ये खडकवासला (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार
इतर महत्वाची बातमी-