एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यात मृत्यूचा लव्ह ट्रँगल? विजय ढुमेच्या हत्येनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Pune Crime News : पुण्यातील विजय ढुमे प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून या प्रकरणात अनेक नवे खुलासे पोलिसांनी केले आहेत.

पुणे : पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime) सत्र वाढत चालल्याचं चित्र आहे. दरम्यान अनेक गुन्हे सध्या पुण्यातून समोर येतायत. त्यातच निवृत्त पोलिसाचा मुलगा असलेल्या विजय ढुमेची हत्या झाली आणि पुण्यात एकच खळबळ माजली. या हत्येमुळे पुन्हा एकदा पुणं हादरलं. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील अशा घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान या प्रकणात पुणे पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय. विजय ढुमेची हत्या लव्ह ट्रँगलमुळे हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

विजय ढुमेची पुण्यातील सिंहगड परिसरामध्ये लाईन बॉय म्हणून ओळख होती. त्याच्या हत्येनंतर शहरात एकच खळबळ माजली होती. पण सिंहगड पोलिसांनी अगदी काहीच वेळात या हत्याकांडाचा छडा लावला. तर या गुन्ह्यांमधील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

नेमंक प्रकरण काय?

प्रेम संबंधांमुळे विजयची हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. विजय याचं लग्न झालं असलं तरीही मागील तेरा वर्षांपासून त्याचं सुजाता ढमाल या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. पण मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद होऊ लागले. त्यातच सुजाताची चार महिन्यांपूर्वी संदीप तुपे या सत्तावीस वर्षीय तरुणाशी झाली. त्यामुळे सुजाता आणि संदीप यांच्या नव्या प्रेमप्रकरणात विजय ढुमेचा अडथळा होऊ लागला. म्हणूनच या दोघांनाही विजय ढुमेची हत्या करण्याचा कट रचला. 

... आणि विजयचं आयुष्य संपलं

29 सप्टेंबर रोजी विजय सिंहगड रोडवरील एका लॉजमधून बाहेर येत होता. त्यावेळी संदीप आणि त्याच्या मित्रांनी लोखंडी सळी आणि लाकडाचा वापर करुन त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी विजयचा जागीच मृत्यू झाला. याबाबत आजूबाजूच्या लोकांना तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

प्रकरणाचा तपास करण्याचं पोलिसांसमोर आव्हान

पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण गजबजलेल्या परिसरामध्ये विजयची हत्या झाल्याने या प्रकरणाचा शोध लावणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. पंरतु त्यातही पोलिसांना फारसं यश आलं नाही. पण तपासादरम्यान पोलिसांना विजयच्या फोनमध्ये सुजाताचे काही फोटो सापडले. तेव्हा पोलिसांना  या लव्ह ट्रॅन्गल आणि त्यातून झालेल्या या हत्येचा उलगडा झाला .

दरम्यान सुजाता हिचं देखील आधी लग्न झालं होतं. पण ती तिच्या नवऱ्यासोबत राहत नव्हती. तर विजय ढुमे याची विवध क्षेत्रात बरीच ओळख होती. त्यातूनच त्याने जमीन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यातूनच तो सुजाताला पैसे पुरवायचा. पण त्याच वेळी त्यांने सुजातावर देखील काही बंधनं घातली. तिला तो नोकरी करण्यासाठी देखील परवानगी देत नव्हता. त्यामुळे त्या दोघांमध्ये सतत खटके उडत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी संदीप तुपे, सागर तूप सुंदर, प्रथमेश खंदारे, एक अल्पवयीन मुलगा आणि विजयची प्रेयसी यांना ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा : 

Pune Crime News : भर रस्त्यात सपासप वार करुन हत्या; अखेर 36 तासांत पोलिसांनी केला हत्येचा उलगडा, नेमकं काय आहे कारण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh: सतीश वाघांची बायकोला मारहाण, सूडाची आग मनात धुमसत असलेल्या अक्षय जावळकरने 70 वार केले अन् पोलिसांना क्लू मिळाला
अक्षयच्या मनात सतीश वाघांविरोधात सुडाग्नी का पेटला होता; पोलिसांना क्लू कसा मिळाला?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Nashik Crime : संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली,  दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली, दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh: सतीश वाघांची बायकोला मारहाण, सूडाची आग मनात धुमसत असलेल्या अक्षय जावळकरने 70 वार केले अन् पोलिसांना क्लू मिळाला
अक्षयच्या मनात सतीश वाघांविरोधात सुडाग्नी का पेटला होता; पोलिसांना क्लू कसा मिळाला?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Nashik Crime : संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली,  दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली, दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Satish Wagh Murder Case : अक्षय आणि मोहिनी वाघचे संबंध, सतीश वाघांना 8 वर्षांपूर्वीच कुणकुण लागली, पुढे जे जे घडलं, पुणे हादरत गेलं!
अक्षय आणि मोहिनी वाघचे संबंध, सतीश वाघांना 8 वर्षांपूर्वीच कुणकुण लागली, पुढे जे जे घडलं, पुणे हादरत गेलं!
Sanjay Raut : बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
Ambernath Crime: शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
Embed widget