एक्स्प्लोर

Sanjay Raut : बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Devendra Fadnavis : सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधील नक्षलवाद संपवा, असे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

Sanjay Raut : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, बीडमधील चित्र वाईट आहे. उद्धव ठाकरे लवकरच बीड आणि परभणी या ठिकाणी जातील. तर बिहारसारखे चित्र कल्याण आणि अंबरनाथमध्ये दिसत आहे. मी एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. त्यांना अर्बन नक्षलवादची फार चिंता आहे.  ⁠बीडमध्ये कोण तुमचे जावई की मुलं आहेत? बीडमध्ये गेल्या काही वर्षात 38 हत्या झालेल्या आहेत. 38 हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या असून त्यातील बहुसंख्य वंजारी समाजाचे आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधील नक्षलवाद संपवा. देवेंद्र फडणवीस यांचा अर्बन नक्षलवाद आवडता शब्द आहे. ⁠बीडमधील अर्बन नक्षलवादाला देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसचा पाठिंबा आहे का? ज्यांनी हत्याकांड घडवली ते तुमच्या मंत्रीमंडळात आहेत. तुम्हाला लाज वाटते का? देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलणं थांबवा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

लाडक्या देवाभाऊंनी बदला घ्यावा

तुम्हाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद मिळाले आहे, ते विरोधकांना संपविण्यासाठी नाही तर जनतेचे संरक्षण करा. ⁠लाडक्या बहिणींचं संरक्षण करा. ⁠परळी आणि आसपासच्या परिसरातील अनेक लाडक्या बहि‍णींचे कुंकू पुसले गेले आहे. ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. लाडक्या देवाभाऊंनी बदला घ्यावा. देवेंद्र फडणवीस, अजित पवार लाडक्या बहि‍णींचे कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना संरक्षण देताय, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

...तर तुम्ही हे खून पचवून ढेकर दिला असता

राहुल गांधी यांचा परभणी दौरा आणि शरद पवार यांच्या बीड, परभणी दौऱ्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी नुसते पर्यटन करू नका, असे म्हणत जोरदार टीका केली. यावरून संजय राऊत म्हणाले की, ⁠पर्यटन करु नका असं तुम्ही म्हणता. मग तुमचे नेते कशाला गेले होते. ⁠जर विरोधी पक्षाने हा आवाज उठवला नसता तर तुम्ही हे खून पचवून ढेकर दिला असता. ⁠बीडमधील पिस्तुल लायसन्स रद्द करा. 1500 लायसन्स आहेत ती सर्व बिहारमधून आणलेले आहेत. ⁠दोन जिल्हे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. 38 महिलांचे कुंकू त्यांनी पुसले आहे. ⁠⁠तुम्ही वेशांतर करता तर मग बीडमध्ये वेशांतर करुन जा. ⁠देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा त्यांना वरदहस्त आहे.  ⁠गुन्हे खपवून घेणार नाही अस म्हणता मग तुमचे हे जावई आहेत का परळीच्या 118 बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही. बंदुकीच्या धाकावर हे मतदान होऊ दिलं नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

कल्याणच्या घटनेवर फडणवीस, श्रीकांत शिंदे गप्प का? 

दरम्यान, कल्याण (Kalyan Crime) येथील अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यावरून संजय राऊत म्हणाले की, कल्याण, अंबरनाथ हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा जिल्हा आहे. ⁠या जिल्ह्यात लुटमार, बलात्काराचे प्रकार वाढले आहेत. गुंडांना अभय दिलं जातंय. आणि येथील ⁠खासदार मतदारसंघात फिरतही नाहीत. बलात्कार, खून करणारे हे बीड आणि कल्याणमध्येच का असतात? ⁠देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

आणखी वाचा 

Satish Wagh: सतीश वाघ प्रकरणात बायकोच मास्टरमाईंड; पैसे अन् व्यवहारासाठी घरची कारभारीण जीवावर उठली, आधी फक्त हल्ला करण्याची मागणी पण नंतर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget