Satish Wagh: सतीश वाघांची बायकोला मारहाण, सूडाची आग मनात धुमसत असलेल्या अक्षय जावळकरने 70 वार केले अन् पोलिसांना क्लू मिळाला
Satish Wagh Murder case: पोलिसांकडून आरोपींची चौकशी केल्यानंतर सतीश वाघ हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. मोहिनी वाघ आणि त्यांचा प्रियकर अक्षय जावळकर यांच्याकडून हत्या
पुणे: पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्या हत्याप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच या हत्येची सुपारी दिली होती. मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याच अनैतिक संबंधांतून ही हत्या झाली. या प्रकरणातील सूत्रधारांना शोधण्यात एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांच्या कामी आली. ती म्हणजे सतीश वाघ यांच्यावर जवळपास 70 वार करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
सुरुवातीला सतीश वाघ यांची पूर्ववैमनस्यातून किंवा एखाद्या वादातून सुपारी देऊन हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, व्यावसायिक गुन्हेगारांना सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली असती तर त्यांनी केवळ हत्या करुन सतीश वाघ यांचा मृतदेह टाकून दिला असता. मात्र, सतीश वाघ यांचा मृतदेह 70 वार करुन छिन्नविछिन्न करण्यात आला होता. इथेच पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा क्लू मिळाला. ज्याअर्थी 70 वार करुन सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली आहे, त्यावरुन मारेकऱ्याच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग असावा, हे पोलिसांनी हेरले. त्यादृष्टीने तपास सुरु केल्यानंतर पोलिसांना अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यातील प्रेमसंबंधांचा सुगावा लागला.
अक्षय जावळकर हा 21 वर्षांचा आणि मोहिनी वाघ या 37 वर्षांच्या असताना त्यांच्यात प्रेमसंबंधांचा अंकुर फुलला होता. त्यानंतर जवळपास 11 वर्षे या दोघांचे अनैतिक संबंध होते. काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबधांचा सुगावा लागला. तेव्हापासून सतीश वाघ हे मोहिनी वाघ यांना सातत्याने मारहाण करायचे. सतीश वाघ यांच्यामुळे दोघांच्याही अनैतिक संबंधात अडथळे येत होता. या गोष्टीचा राग अक्षय जावळकर याच्या मनात धुमसत होता. त्यामुळेच सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर अक्षय जावळकर आणि त्यांच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर 70 वार केले. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. सतीश वाघ यांना चाकूने 72 वेळा भोसकताना त्यांचे गुप्तांगही कापण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. एखाद्या बाहेरच्या मारेकऱ्याला हत्येची सुपारी दिली असती तर त्याने इतक्या निर्घृणपणे खून केला नसता. पण सतीश वाघ यांच्या अंगावरील 72 वार पाहता मारेकरी सुपारी किलर नाहीत, हे पोलिसांच्या लक्षात आले. या हत्येमागे केवळ पैसा हे कारण नसून वैयक्तिक द्वेष असावा, हे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यादृष्टीने तपास करण्यात आला होता.
आणखी वाचा