एक्स्प्लोर

Pooja Khedkar: श्रीमंती राहण्याचा थाट अन् चमकोगिरीचा हव्यास नडला, पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली

Pune News: प्रोबेशनवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावलं, गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी; पुण्यातील चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.

पुणे: खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले, असे आरोप करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यात (Pune District) परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या श्रीमती पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, आता याच खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे म्हणत व्हॉट्सअप चॅटचे फोटोदेखील जोडले आहेत.

कोण आहेत डॉ. पुजा खेडकर?

पुजा या 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढले आहेत. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

आणखी वाचा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयएएस अधिकाऱ्याची स्वतःच्याच जिल्ह्यात नियुक्ती, विरोधकांचा आक्षेप

भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप आमदाराकडून मुख्यमंत्र्यांना शिफारस, डॉ. भारती लव्हेकर यांचं पत्र व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
James Anderson : 42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Sancheti Home Raid : वैजापुरात प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेतीच्या घरावर छापेDevendra Fadanvis PC FULL : Rahul Gandhi यांच्याभोवती Urban Naxal चा घोळका, फडणवीसांचा आरोपDhananjay Munde On Maharashtra Assembly 2024 : दोन निवडणुकांचा मुहतोड जवाब द्यायचाय, माझा अस्त करण्याचा प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 November 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
James Anderson : 42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
Akbaruddin Owaisi: 'फक्त 15 मिनिटं पोलीस बाजूला करा', त्या प्रक्षोभक भाषणाबाबत अकबरुद्दिन ओवेसीं म्हणाले....
'फक्त 15 मिनिटं पोलीस बाजूला करा', त्या प्रक्षोभक भाषणाबाबत अकबरुद्दिन ओवेसीं म्हणाले....
Astrology : 7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, आर्थिक स्थिती उंचावणार
ग्रहांचा राजा सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, आर्थिक स्थिती उंचावणार
Embed widget