(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Ganesh visarjan Noise Pollution : बापरे नुसत्याच कानठळ्या! मागील 20 वर्षात यंदा सर्वाधिक आवाजाची पातळी, कशी मोजली जाते आवाजाची पातळी?
Pune Ganesh Immersion : पुण्यातील महत्वाच्या चौकात दरवर्षीपेक्षा दुप्पट आवाजाची पातळी गाठली होती. 105 डेसिबल्स एवढी आवाजाची पातळी होती. त्यामुळे अनेक नागरिकांना आवाज असह्य झाला होता.
पुणे : पुण्यात 28 तास मिरवणुका चालल्या मात्र याच मिरवणुकीमध्ये ध्वनी पातळीने चक्क शंभरी गाठली होती. पुण्यातील महत्वाच्या चौकात दरवर्षीपेक्षा दुप्पट आवाजाची पातळी गाठली होती. 105 डेसिबल्स एवढी आवाजाची पातळी होती. त्यामुळे अनेक नागरिकांना आवाज असह्य झाला होता. पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाने दिलेल्या अहवालानुसार खंडोजीबाबा चौकात 129.2 डेसिबेल्स होता तर सर्व परिसरात पहाटे 49 डेसिबेल्स आवाजाची नोंद झाली आहे. मागील 20 वर्षांत यंदा सर्वाधिक आवाजाच्या पातळीची नोंद झाली आहे.
या वर्षीचा एकंदर आवाज सर्वाधिक (सरासरी 105.2 डेसिबेल्स) नोंदवला गेला. लक्ष्मी रस्त्यावर सर्वत्र दिवस-रात्रीच्या नियमातील सरासरीपेक्षा दुप्पटीने ओलांडला गेला. दोन दिवसात येथील वातावरण अतिशय असह्य होते असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलं आहे.
2001 पासून ते 2023 पर्यंतची आकडेवारी बघितली तर 2022 आणि 2023 सर्वाधिक आवाजाची पातळी असल्याचं समोर येतं. 2007 पासून आवाजाच्या पातळीच वाढ झाल्याचं या अहवालातून दिसून येत आहे. मागील वीस वर्षांची आकडेवारी पुढील प्रमाणे...
2001- 90.7 डेसिबेल्स
2002-90.9 डेसिबेल्स
2003- 91.5 डेसिबेल्स
2004- 92.8 डेसिबेल्स
2005- 94.1 डेसिबेल्स
2006- 96.2 डेसिबेल्स
2007-102.2 डेसिबेल्स
2008- 101.4 डेसिबेल्स
2009- 79.14 डेसिबेल्स
2010- 100.9 डेसिबेल्स
2011-87.4 डेसिबेल्स
2012-104.2 डेसिबेल्स
2013-109.2डेसिबेल्स
2014- 96.3 डेसिबेल्स
2015-96.6 डेसिबेल्स
2016- 92.6 डेसिबेल्स
2017- 90.9 डेसिबेल्स
2018-90.4 डेसिबेल्स
2019- 86.3 डेसिबेल्स
2020-59.8 डेसिबेल्स
2021-59.8 डेसिबेल्स
2022-105.2 डेसिबेल्स
2001- 90.7 डेसिबेल्स
2002-90.9 डेसिबेल्स
2003- 91.5 डेसिबेल्स
2004- 92.8 डेसिबेल्स
2005- 94.1 डेसिबेल्स
2006- 96.2 डेसिबेल्स
2007-102.2 डेसिबेल्स
2008- 101.4 डेसिबेल्स
2009- 79.14 डेसिबेल्स
2010- 100.9 डेसिबेल्स
2011-87.4 डेसिबेल्स
2012-104.2 डेसिबेल्स
2013-109.2डेसिबेल्स
2014- 96.3 डेसिबेल्स
2015-96.6 डेसिबेल्स
2016- 92.6 डेसिबेल्स
2017- 90.9 डेसिबेल्स
2018-90.4 डेसिबेल्स
2019- 86.3 डेसिबेल्स
2020-59.8 डेसिबेल्स
2021-59.8 डेसिबेल्स
2022-105.2 डेसिबेल्स
2023- 105.2 डेसिबेल्स
आवाजाची पातळी कशी मोजली जाते?
साऊंड लेव्हल मीटर नावाचं यंत्र असतं. हे यंत्र मोबाईलच्या आकारचं असतं. त्याचं डिजीटल आऊटपूट असतं. या यंत्राच्या माध्यामातून आवाजाची पातळी मोजली जाते. पुण्यातील 10 चौकांमध्ये ही आवाजाची पातळी मोजली जाते. बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक,कुंटे चौक, उंबऱ्या गणपती चौक, गोखले चौक, शेडगे चौक, होळकर चौक, टिळक चौक, खंडूजी चौक बाबा चौक या चौकांमधील आजावाची नोंद घेतली जाते. मात्र ही नोंद एकदाच घेतली जात नाही तर दर चार तासांनी प्रत्येक चौकातील आवाजाच्या पातळीच्या 50 नोंदी घेतल्या जातात. त्याची सरासरी काढून 24 तासांची आवाजाची पातळी मोजली जाते, असं सीओइपी महाविद्यालयाचे Department of Applied Sciences and Humanities या विभागाचे प्रमुख विभाग डॉ. महेंद्र शिंदीकर यांनी सांगितलं आहे.
ध्वनी पातळी मोजणीची वैशिष्ट्ये:
1) स्थलकालपरत्वे (spatio-temporal) आणि शास्त्रीय (Scientific) पद्धतीने मोजणी केली जाते.
2) लक्ष्मी रस्त्यावरील 24 तासातील आणि 10 चौकातील आवाजाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. सदर उपक्रम गेली 22 वर्षे नित्यनेमाने याच शिस्तीने आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून करण्यात आला आहे.
3) ही सर्व निरीक्षणे केवळ अभ्यास, जनजागृती आणि संशोधन यासाठीच वापरण्यात येतात.
5) कोणत्याही स्रोताच्या संदर्भात या नोंदी घेत नसून या मिरवणुकीच्या दरम्यान चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणारा आवाज याद्वारे नोंदविला जातो.
5) दर वर्षीच्या मिरवणुकी दरम्यान नोंदवलेली प्रमुख निरीक्षणे आवर्जून नोंदविली जातात.
विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा
नियोजन: जयवंत नांदोडे आणि इशिता हुमणाबादकर
विद्यार्थी स्वयंसेवकः प्रत्यक्ष मोजणी – सुयोग लोखंडे, इंद्रजीत देशमुख, पार्थ धोटे, रणदिग्विजय जाधव, अथर्व डांगे, आदित्य संजीवी, आनंद पाणजकर, तेजस जोशी, शार्दुल लोकापुरे, शितीज राजपूत
आकडेवाडीचा निष्कर्ष: इरा कुलकर्णी, सात्विका उदयकुमार, समृद्धी तागडे, गायत्री ठकार माजी विद्यार्थी: पद्मेश कुलकर्णी, नागेश पवार
इतर महत्वाची बातमी
Pune news : अखेर मिरवणूक संपली; अलका टॉकीज चौकात 28 तास दणदणाट!