(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : रुममध्ये धूर केला, पाण्याच्या टाकीत 20 लाख टाका, 5 कोटी करुन देतो म्हणाले अन् नंतर जे केलं ते पाहून महिला हादरली, नेमकं काय घडलं?
पाण्याच्या टाकीत पैसे टाका सगळे पैसे 20 पट करून देतो, असं सांगत पुण्यातील महिलेला 20 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत ही घटना घडली आहे.
पुणे : पुण्यात सध्या भोंदू बाबांची प्रकरणं (Pune Crime News) बाहेर येत आहे. अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींचं आमिष दाखवून गंडा घालता जात आहे. पाण्याच्या टाकीत पैसे टाका सगळे पैसे 20 पट करून देतो, असं सांगत पुण्यातील महिलेला 20 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. रूममध्ये धूर करून, पूजा करतो तसंच 20 लाखांचे 12 दिवसात 5 कोटी होतील या अमिषाला महिला पडली बळी. पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत ही घटना घडली. हा सगळा प्रकार समजल्यावर 41 वर्षीय महिलेची पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी अशा 4 जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे व्यावसायिक भागीदार असलेले मित्रांची प्लॉटच्या व्यवहारानिमित्त दोन महिन्यांपूर्वी तनवीर पाटील यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर तनवीरने महिलेला 20 लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवले. हे सगळं ऐकून महिला आणि त्यांच्या मित्रांनी अशा तिघांनी मिळून 20 लाख रुपये जमवले. त्यानंतर हा प्रकार सुरु झाला.
नेमकं काय घडलं?
13 सप्टेंबर रोजी 200 लिटरच्या बॅरेलमध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले आणि त्यानंतर त्या रूमची लाईट बंद करून त्या ठिकाणी आरोपींनी धूर केला आणि महिलेला बाहेर जाण्यास सांगून रुम बंद केली. फिर्यादीस ते हरिद्वार येथे जाऊन पूजा करून आल्यानंतर या 20 लाख रुपयांचे 12 दिवसात पाच कोटी होतील, असे सांगितलं आणि घरातून निघून गेले. 8 ते 10 दिवसांनी महिलेने या आरोपींना फोन केला. त्यावेळी त्यांनी फोन उचलले नाहीत. त्यानंतर महिलेने रुम उघडून बघितली तर त्या रुममध्ये पैसे नसल्याचं समोर आलं आणि हे चारही जण वीस लाख रुपये घेऊन निघून गेल्याचं लक्षात आलं. फसवणूक झाल्याचं देखील लक्षात आलं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर दोघांना पोलीस अजूनही शोध घेत आहेत. त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना अशा भूलतापांना बळी पडू नका, असं आवाहन पोलीस करत आहेत.
इतर महत्वाची बातमी-