एक्स्प्लोर

Kolhapur Crime : अंगाला अंगारा फासून 'ओम भट्ट स्वाहा' करत स्मशानभूमीत भोंदूगिरीचा प्रकार; एका मांत्रिकासह 14 जणांच्या टोळीचा पर्दाफाश

एका मांत्रिकासह 13 ते 15 जणांच्या टोळीने अघोरी यज्ञ पार पडला. गावातील सतर्क तरुणांनी हा प्रकार पाहिल्यानंतर मांत्रिकासह सहभागी झालेल्या काही जणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

शिरोळ (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) शिरोळ तालुक्यातील (Shirol) गणेशवाडीत कृष्णा नदी काठच्या स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री 'ओम भट्ट स्वाहा' करुन भोंदूगिरी (Black Magic) करण्याचा प्रकार हाणून पाडण्यात आला. एका मांत्रिकासह 13 ते 15 जणांच्या टोळीने अघोरी यज्ञ पार पडला. गावातील सतर्क तरुणांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ही भोंदूगिरी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मांत्रिकासह सहभागी झालेल्या काही जणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

तीन तास यज्ञ जाळून ओम भट्ट स्वाहा

कृष्णा नदी काठाला नैसर्गिक खडकाचा घाट आहे. त्याठिकाणी स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून मांत्रिक वेशातील एका मंत्रिकासह सांगली जिल्यातील तब्बल 13 ते 15 जणांनी एक यज्ञ पेटवला. तीन तास यज्ञ जाळून ओम भट्ट स्वाहा झाल्यानंतर इच्छित विधी झाल्यानंतर ती मंडळी निघाली. हनुमान मंदिराजवळ सांगली पासिंग असलेली दुचाकी तसेच एक रिक्षा लावली होती. तिथे आल्यानंतर गावातील युवकांनी त्यांना हे काय केला? अशी विचारणा केल्यानंतर पूजा केल्याचे सागितले. अधिक चौकशी केली असता भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला. तरुणांनी बॅगा पाहिले असता त्यामधे लिंबू, कुंकू, हळद, दोरा गंडे, नारळ आदी साहित्य सापडले. 

कोणाला फसवण्याचा उद्देश तर नाही ना?

भोंदूगिरी कृती असल्याचे लक्षात आल्यानंतर मांत्रिकासह अन्य काहीजणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. काहींनी पलायन केले. मात्र, हा यज्ञ कशासाठी करण्यात आला? यामागे काही कारण आहे का? कोणाला फसवण्याचा उद्देश तर नाही ना? अशीही शंका उपस्थित झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच गणेशवाडीपासून 10 किमी अंतर असलेल्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये भोंदू बाबाच्या नादी लागून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात मांत्रिकानेच कोट्यवधी रुपयांना फसवून त्यांना विष दिले होते. त्यामुळे हे प्रकरण ताजे असताना सांगलीमधील एका मांत्रिकासह 14 जणांची टोळी गणेशवाडी कृष्णा नदी घाटावर आल्याने व केलेल्या या भोंदूगिरीने भूवया उंचावल्या आहेत. 

म्हैसाळ येथील शिक्षक पोपट वनमोरे, त्यांचा भाऊ पशुवैद्यकीय डॉ. माणिक वनमोरे या दोघा भावांसह त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांना जून महिन्यात विषारी औषध देऊन त्यांची सामूहिक हत्या करण्यात आली होती. गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे यांनी मांत्रिक अब्बास यास मोठी रक्कम दिली होती. मात्र, गुप्तधन मिळाले नसल्याने यासाठी घेतलेली रक्कम परत देण्यासाठी वनमोरे यांनी मांत्रिक अब्बास याला तगादा लावला होता. यामुळे अब्बासने वनमोरे कुटुंबीयांना काळ्या चहातून विषारी गोळ्या देऊन नऊ जणांची हत्या केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Loha Nagarparishad : भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट Special Report
Eknath Shinde Delhi : राज्यात 'घाव', शाहांकडे धाव; महायुतीतील फोडफोडीचा वाद दिल्ली दरबारी Special Report
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayander : मिरा-भाईंदरमधील वाहतून कोंडी कशी सुटणार?
Delhi Blast : दिल्लीतील हल्ल्यामागे पाकचा हात? Pok च्या माजी पंतप्रधानाची मोठी कबुली
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेचं मैदान कोण मारणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Embed widget