एक्स्प्लोर

पूजा खेडकर यांचे 'बारामती कनेक्शन'; मुळशीतही अरेरावी, दमदाटी करत जमीन बळकावल्याचा आरोप; खेडकरांचे पाय दिवसेंदिवस खोलात

IAS Pooja Khedkar: जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या या ट्रेनी आयएएस (Trainee IAS Officer) अधिकाऱ्याची चर्चा रंगली आहे. पूजा खेडकरांची अनेक वादग्रस्त प्रकरणं समोर येत आहेत.

IAS Probationer Pooja Khedkar : पुणे : अधिकारी होण्यापूर्वीच थाटात रुबाब करणाऱ्या आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर (Dr. Pooja Khedkar) यांचे एक, दोन नाहीतर अनेक कारनामे बाहेर आले आहेत. केवळ पूजा खेडकरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कारनामे, अरेरावी यासंदर्भातील प्रकार समोर आलं आहे. अशातच आता पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. तसेच, खेडकर कुटुंबीयांनी मुळशीमध्येही अरेरावी आणि दमदाटी करुन जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. 

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं बोललं जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्यानं खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे.

अरेरावी, दमदाटी करत मुळशीतली जमिनही बळकावली 

वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी ही जमिन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं. 

आश्चर्याची बाब म्हणजे, या शेतकऱ्यांनी याबाबत पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला आहे. वरून दबाव आल्यानं त्यांची साधी तक्रारही नोंदवली गेली नाही. त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्यात. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पूजा खेडकरच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली, एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावरही त्या धावून आल्या, आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. पुणे पोलिसांनी खेडकर यांना वॉट्स अँपवर नोटीस पाठवली आहे.

LBSNAA नं मागवला डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल

लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने महाराष्ट्र सरकारकडून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रेनी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तसेच, त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट OBC जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

वादानंतर नागरी सेवा परीक्षेत निवडीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबतही आता नवी माहिती समोर आली आहे. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा केल्याची माहिती मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Embed widget