Shirur Shivajirao Adhalrao Patil : घड्याळातील काटे बाणाचे असतील अन् शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, कार्यकर्त्यांच्या भावना!
राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची. असा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असल्याचं आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
शिरुर, पुणे : शिरुर मतदार संंघात महायुती सध्या कोण उमेदवार देणार याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र त्यानंतर वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर आज आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचं आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघ गेली आठवडाभर चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार इथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो. ते म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यामुळं त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं?याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्ते ही म्हणतायेत, की राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे.
शिरुर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आणि त्याच दिवसापासून या मतदार संघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या. महायुतीत याच मतदार संघासाठीट रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांनी याच अनुषंगाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि याच मतदार संघातील महत्वाचं नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदार संघावरुन खलबतं झाली आणि अजित पवारांनी या ठिकाणी दबावाचं राजकारण केल्याचं बोललं जात आहे. आता कार्यकर्त्यांनीदेखी आणि आढळरावांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे.
इतर महत्वाची बातमी-