Ramesh Pardesi drugs Video : मदत करणं गुन्हा आहे का?, I Support Ramesh Pardesi!, पिट्या दादासाठी सोशल मीडियावर पोस्ट
सोशल मीडियावर I Supoort Ramesh Pardesi म्हणत अनेकजण पोस्ट करताना दिसत आहे. शिवाय मदत करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्नही अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
पुणे : अभिनेते रमेश परदेसी यांनी वेतळ टेकडीवरील (Pune Drugs) नशेत असलेल्या मुलींचा व्हिडीओ पोस्ट करुन पुण्यातील तरुणाईचं वास्तव समोर आणलं होतं. मात्र त्यानंतर या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या अनेकांनी ही त्या मुलींची खासगी बाब असल्याचं म्हटलं होतं. तर अनेकांनी तरुणांच्या वागण्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता सोशल मीडियावर I Supoort Ramesh Pardesi (Ramseh Pardesi)म्हणत अनेकजण पोस्ट करताना दिसत आहे. शिवाय मदत करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्नही अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
मदत करणं गुन्हा असेल तर इथुन पुढे हा समाज कोणी शेवटची घटका जरी मोजत असेल तरी मदत करायला भीतीने शंभर वेळा विचार करेल, अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रमेश परदेसींचा एक व्हिडीओदेखील आहे. यात ते म्हणातात की, त्याला अक्कल नाही काय? त्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, असं सगळं म्हणत आहेत.या मुलींचं आयुष्य मी वाया घालवलं नाही तर त्यांना वाचवलं आहे. हे मी जबाबदारीने बोलत आहे. ज्या ठिकाणी त्या नशेत पडल्या होत्या. तिथे कोणालाही कळलं नसतं की अशा मुली इथे आहेत. शनिवारचा दिवस आणि चारही बाजूने असलेल्या वस्त्या आणि याच वस्त्यांमधून दारु प्यायला येणारी मुलं. जर आपलं लक्ष गेलं नसतं आणि त्या मुली इतरांच्या तावडीत सापडल्या असत्या तर आता मी ज्या प्रतिक्रिया ऐकत आहो. त्यावेळी ऐकायला कोणीही उरलं नसतं. मला ज्यावेळी ती माझी जबाबदारी वाटली म्हणून मी मदत केली. त्यांचा जीव वाचवणं गरजेचं वाटलं म्हणून मी मदत केली. मदत करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्नही रमेश परदेसी या व्हिडीओत विचारताना दिसत आहे.
वेताळ टेकडीवर नेमकं काय घडलेलं?
रमेश परदेसींनी त्या संध्याकाळी काय घडलं ते सांगितलं आहे. ते म्हणतात, गेली अनेक वर्ष वेताळ टेकडीवर पळायला येतो. पळत असताना अचानक दोन तरुणी टेकडीवर झोपलेल्या दिसल्या. एक तरुणी झाडाला टेकून होती आणि एक तरुणी खाली झोपलेली होती. त्या तरुणींच्या जवळ जाऊन बघितल्यावर त्यांच्या तोंडाला फेस आल्यासारखा दिसला. हे पाहताच मी दोन मुलांना आवाज दिला आणि त्यांची मदत घेऊन मोकळ्या हवेत घेऊन आलो. त्यानंतर त्यांना काय होत आहे, हे आमच्यातील कोणालाही कळत नव्हतं. आम्ही शुद्धीत असलेल्या मुलीला पाणी प्यायला दिलं तर तिथे थेट उलटी केली. त्यानंतर टेकडीवर व्यायामाला आलेल्या अनेकांची मदत मागितली मात्र काहींनी मदत केली तर काहींनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर धाडवे पाटील नावाच्या मित्राची कार घेतली आणि दोन्ही मुलींना दवाखान्यात दाखल केलं आणि या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.
View this post on Instagram
इतर महत्वाची बातमी-