Jay Pawar on Baramati Election : अजितदादा म्हणतात, बारामतीत मला एकटं पाडलं जाईल, पण चिरंजीव जय पवार म्हणाले दुसरचं काही!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनीही (Jay Pawar on Baramati Election) आज बारामती दौरा केला. बारामतीतील राष्ट्रवादी भवन या कार्यालयाला जय पवारांनी भेट दिली.
बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभेला (Baramati Loksbha) शड्डू ठोकल्यानंतर मतदारसंघात दौऱ्यावर दौरे सुरु आहेत. वरिष्ठ भावनिक करतील म्हणत टीका केलेल्या अजित पवार यांनीच आता बारामतीमध्ये मला एकटं पाडलं जाईल म्हणत वेगाने भावनिक प्रचार सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनीही (Jay Pawar on Baramati Election) आज (22 फेब्रुवारी) बारामती दौरा केला. बारामतीतील राष्ट्रवादी भवन या कार्यालयाला जय पवारांनी भेट दिली. यावेळी सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जय पवार यांनी केल्या.
तरुणांचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे
जय पवार म्हणाले की, आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षफुटीनंतर कोणताही फरक वाटत नाही. आमच्यासोबत जनता आहे. तरुणांचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. लोकांच्या समस्या मी अजित दादांना सांगणार असून दादा त्यावर मार्ग काढतील.
कुटुंबाला एकटं पाडलं आहे असं मला वाटत नाही
महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेच उमेदवार असल्याने कुटुंबातील लढाई अवघड जाईल का? असे विचारले असता जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजून उमेदवार निश्चित झालेला नाही. यापूर्वी दोनदा मी प्रचार केला आहे आताही प्रचार करेन. सुनेत्रा पवारांची चर्चा होत आहे, पण ज्यावेळी दादा आपला उमेदवार जाहीर करतील त्यावेळी आपल्याला समजेल कुटुंब म्हणून मी अजित पवारांना विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रचार करायचा असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आपण प्रचार करू ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल, आपण उमेदवाराचा प्रचार करू.उमेदवार अजून माहीत नाही. त्यामुळे आपल्याला अवघड जाईल का नाही? हे सांगता येत नाही, पण तरीही आपण समजून घेऊ की प्रचार करणे अवघड जाणार आहे. कुटुंबाला एकटं पाडले आहे असं मलाही वाटत नाही. जेव्हा प्रचार सुरू होईल तेव्हा कळेल कोण कुणाच्या बाजूनं आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या