Pune Ganeshotsav : देवेंद्र फडणवीसांचा आज पुण्यात 'मंडळ टू मंडळ' दौरा, दगडूशेठ चरणी होणार लीन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असणार आहे. गणेशोत्सवानिमित्त त्यांचा हा दौरा असणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील असण्याची शक्यता आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आज पुणे दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांचा हा दौरा असणार असल्याची माहिती आहे. आज (21 सप्टेंबर) ते पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देत दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची ते भेट घेणार असल्याचीदेखील माहिती आहे. त्यामुळे फडणवीसांचा आजचा दौरा 'मंडळ टू मंडळ' दौरा असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
कसा असेल फडणवीसांचा 'मंडळ टू मंडळ' दौरा?
सायं. 5.40 वाजता : गणेश दर्शन, कसबा गणपती, कसबापेठ, पुणे
सायं. 6 वाजता : गणेश दर्शन, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.15 वाजता : गणेश दर्शन, तांबडी जोगेश्वरी गणपती, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.35 वाजता : गणेश दर्शन, गुरुजी तालिम मंडळ, लक्ष्मीरोड, पुणे
सायं. 6.55 वाजता : गणेश दर्शन, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 7.15 वाजता : गणेश दर्शन, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई, पुणे
सायं. 7.30 वाजता : गणेश दर्शन, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग, पुणे
सायं. 7.45 वाजता : गणेश दर्शन, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे
रात्री 8.30 वाजता : गणेश दर्शन, साने गुरुजी मित्रमंडळ, अंबील ओढा, पुणे
रात्री 9 वाजता : गणेश दर्शन, साई गणेशोत्सव मित्र मंडळ, कोथरुड, पुणे
देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील आज पुण्यात विविध कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत ते देखील फडणवीसांसोबत पुण्यातील गणपती मंडळांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पुण्यात गणपती मंडळांसमोर पुण्यातील आणि राज्यातील भाजप नेत्यांची मोठी फळी उपस्थित राहणार आहे. भाजप नेत्यांचं सध्या पुण्यावर बारीक लक्ष आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप नेत्यांचे पुणे दौरे वाढल्याचं बघायला मिळत आहे. त्यात गणपती दर्शन हा महत्वाचा कार्यक्रम असणार आहे. या मार्फत मंडळांच्या कार्यकर्त्यांचीदेखील भेट घेणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची विविध कार्यक्रमात उपस्थिती...
सकाळी 09.30 : लोकनेते श्री लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार पिंपरी चिंचवड पुणे आणि निर्माल्य सेवा ट्रस्टच्यावतीने प. पू. प्रदीपजी मिश्रा यांचे अष्टविनायक शिवमहापुराण कथा कार्यक्रम, पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी
सकाळी 10.45 : मेरी माटी मेरा देश कार्यक्रमास उपस्थिती, विनायक नवयुवक मित्र मंडळ, भांडारकर इन्स्टिट्युट रोड, पुणे
सकाळी 11.00 : भाजपा पुणे शहर नवनिर्वाचित कार्यकारिणी बैठक
दुपारी 01.00 : नमो चषक कार्यकारिणी बैठक
दुपारी 04.00 : शहरातील विविध गणेश मंडळांना भेट
इतर महत्वाची बातमी-