एक्स्प्लोर

Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत

Bopdev Ghat Incident: पीडित तरुणीला विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘मनोधैर्य’ योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून याबाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात काही दिवसांपुर्वी बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील नराधम आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर पिडित तरूणीला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणातील पीडित तरुणीला विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘मनोधैर्य’ योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून याबाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘मनोधैर्य’ योजनेच्या अंतर्गत अत्याचार प्रकरणातील पीडितांना मदत केली जाते.

पुणे शहर परिसरातील बोपदेव घाटात 3 ऑक्टोबर रोजी मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा आणि शस्त्रांचा धाक दाखवून  3 नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली आहे, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शाेध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींनी सर्व माहिती सांगितली असून त्यांनी घटनास्थळ देखील दाखवलं आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेतील पिडितेला आता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ‘मनोधैर्य’ योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित तरुणीने विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. अर्ज दिल्यानंतर नऊ दिवसांमध्ये संबंधित अर्ज मंजूर करून पीडित तरुणीला नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

नुकसान भरपाईसाठी मिळणाऱ्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही तरुणीला रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. तर उर्वरित 75 टक्के रक्कम ही दहा वर्षांसाठी पीडित तरुणींच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल. या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून ती उपचार घेऊ शकणार आहे, त्याचबरोबर इतर दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मदत होईल.

काय आहे मनोधैर्य योजना?

एखाद्या घटनेतील पीडित बालक किंवा महिलेचं पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरू करण्यात आलेली आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होते. संबधित पीडित महिलेला कमीत कमी 30 हजार रुपयांपासून जास्तीत जास्त दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. पीडित महिलांना आधार आणि धैर्य मिळण्यासाठी या योजनेची सुरूवात करण्यात आली होती. 

बोपदेव घाट परिसरातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने 11 ऑक्टोबर रोजी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो 19 ऑक्टोबर रोजी निकाली काढण्यात आला, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil NCP : 24 ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज भरणारMVA Disputes : भंडारा मतदारसंघात शिवसेनेचं अस्तित्व नाही; काँग्रेसचा आरोप9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
Shani 2024 : दिवाळीपासून 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार; शनीची चाल करणार कमाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
दिवाळीपासून 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार; शनीची चाल करणार कमाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
Embed widget