Sunetra Pawar Met Sangram Thopte : सुनेत्रा पवार कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटेंच्या भेटीला; थोपटेंच्या वडिलांची केली विचारपूस, कारण ठरलं...
सुनेत्रा पवारांनी भोर वेल्हाचे आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे वडिल अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे.
पुणे : सध्या राज्याच्या (Pune News) राजकारणाचं बारामती लोकसभेवर (Baramati Loksabha Election 2024) लक्ष लागलं आहे. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यांत लढत होण्याच दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणते आमदार आण कार्यकर्ते कोणाला साथ देणार? याची चर्चा सुरु असतानाच सुनेत्रा पवारांनी भोर वेल्हाचे आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे वडिल अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे.
सुनेत्रा पवारांनी आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे वडिल अंनंतराव थोपटे यांची घरी जाऊन वडिलांचे विचारपूस केली आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत मात्र संग्राम थोपटे आणि त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांचं शरद पवारांच्या सोबत कधीच पटलं नव्हतं. मागील अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये हे दोघे एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले गेले आणि हा संग्राम थोपटे यांचा विधानसभेचा भोर वेल्हा मतदार संघ आहे. तो बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. शरद पवार आणि त्यांचं कधीच राजकारणात जमलं नाही तोच विरोध आहे अजित पवारांपर्यंत देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे अजित पवारांनीदेखील संग्राम थोपटेंचा विरोध करण्याचा अनेकदा प्रयत्न केला.
मात्र आता राष्ट्रवादीत फूट पडली. त्यानंतर बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीची लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात येत असलेले सहा विधानसभा मतदार संघात काम करायला आणि दौऱ्याला सुरुवात केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. बारामती काबिज करण्यासाठी त्यांनी चंंग बांधला आहे. संग्राम थोपटे आणि कुटुंबियांचं राजकीय वादावादी असली तरीही संग्राम थोपटे सुप्रिया सुळेंना साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी जर सुळेंना साथ दिली तर सुनेत्रा पवारांचं कठिण होईल. त्यामुळे अजित पवार संग्राम थोपटेंच्या कुटुंबियांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या भेटीतून दिसून आलं आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. बारामती काबिज करण्यासाठी खुद्द शरद पवारही मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार अशी लढत यंदा पाहायला मिळणार आहे.
इतर महत्वाची बातमी-