Amol Kolhe Vs Adhalrao Patil : शिरुरमध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंमध्ये तू तू मै मै सुरुच!
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात तू तू मै मै सुरुच असल्याचं चित्र आहे
शिरुर, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील ( adhalrao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्यात तू तू मै मै सुरुच असल्याचं चित्र आहे. डमी उमेदवार आणि डॅडी उमेदवार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एकमेकांवर निशाणा साधला आहे.विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केलाय याला शिवाजी आढळराव पाटलांनी प्रतिउत्तर देत तू पोलीसांत गुन्हेगार त्याला मी काय करणार, अशा शब्दात आढळरावपाटीलांनी कोल्हेंना प्रतिउत्तर दिलं आहे.
शिरुर लोकसभेचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आपेक्ष घेण्यात आल्यानंतर अर्ज वैध ठरला यावरुन अमोल कोल्हेंनी आढळरावपाटीलांना लक्ष करत विरोधकांकडून रडिचा डाव खेळला गेल्याचा आरोप केला या प्रतिउत्तर देत आढळरावपाटीलांना कोल्हेंवर निशाना साधला आहे. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरला खरा पण आरोप माझ्यावर ठेवले गुन्हे तु करायचे पोलिसांमध्ये गुन्हेगार तु..! पराभव झाल्यानंतर कोल्हे जसा ऊसात जातो अन उंदीर बिळात जातो त्याला आढळराव काय करणार? अशा शब्दात कोल्हेंना आढळराव पाटीलांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणालेले?
विरोधकांच्या छातीत धडकी भरली, म्हणून रडीचे डाव खेळायला सुरवात झाली आहे.बालिशपणाच राजकारण करतायेत. पणहे करुन ही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं कमी होईना. विरोधकांना एकच सांगतो, सामना दिलेरीने खेळायचा असतो, भ्याडा सारखा खेळायचा नसतो.एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार हे ठणकावून सांगितलं. कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत असल्याचं कोल्हे म्हणाले होते.
आढळराव पाटलांचं प्रतिउत्तर
अमोल कोल्हेंचा अर्ज काही एक गुन्हा लपवल्यामुळे अवैध ठरला होता. मात्र त्यानंतर अर्ज वैध ठरला. गुन्हे तुम्ही करायचे आणि आम्ही षडयंत्र रचलं म्हणून आरोप करायचे. पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच आता अमोल कोल्हेंमा फक्त आणि फक्त आढळराव पाटील दिसायला लागले आहेत, असा टोला अमोल कोल्हेंना लगावला आहे आणि फार काळजी करण्याची गरज नाही, पुढील 15 दिवस शांततेत प्रचार करायचा आहे, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
इतर महत्वाची बातमी-
Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवाशी बस दरीत कोसळली; 28 जण जखमी