एक्स्प्लोर

Ajit Pawar : माझं पॅनेल निवडून द्या, माळेगावला 500 कोटी देतो; कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजितदांदांनी राज्याची तिजोरी खुली केली

Malegaon Sugar Factory Election : माळेगाव इतका भाव दुसऱ्या कारखान्याला दिला असता तर माझ्या समोर कुणी पॅनेल उभे केले नसते असं अजित पवार म्हणाले

पुणे : माझ्या हातात राज्याचे कृषी, सहकार आणि एक्साईज खातं आहे. तुम्ही मला खुश करा, मी तुम्हाला खुश करतो असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माळेगाव कारखान्याच्या मतदारांना उद्देशून म्हटलं.  कारखान्यामध्ये माझं पॅनेल निवडून आलं तर माळेगावला 500 कोटी रुपये देतो असंही ते म्हणाले. येत्या 22 जून रोजी माळेगाव सहकारी साखर कारख्यान्याची निवडणूक होणार असून त्यासाठी अजित पवार शिरवली गावातील मतदारांना संबोधित करत होते. 

आता जे आपल्याला विरोध करत आहेत त्यांनी जर कारखाना चांगला चालवला असता तर लोकांनी आम्हाला संधी दिली असती का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. ज्या ठिकाणाहून मतदान जास्त होईल त्या ठिकाणचा स्वीकृत संचालक घेणार असं अजित पवार म्हणाले. 

Malegaon Sugar Factory Election : काका-पुतण्या पुन्हा आमने-सामने

कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. बारामती तालुक्यातील राजकारणाचं महत्वाचं केंद्र असलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 तारखेला निव़डणूक होणार आहे. हा स्थानिक प्रश्न असल्याचं सांगत असले तरी शरद पवार स्वत: प्रचारात उतरले आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ब गटातून स्वत: अध्यक्षपदासाठी उभे आहेत तर दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सगळी सूत्रं स्वत: शरद पवारांनी हाती घेतली आहेत. लोकसभा, विधानसभेनंतर माळेगाव कारखाना निवडणुकीत तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.

Ajit Pawar Malegaon Election Speech : अजित पवार काय म्हणाले? 

तुम्ही मला मते द्या, मी कामे करतो. पूर्वी रस्त्यांची काय अवस्था होती आता काय आहे हे पाहा. जे आडमुठापणाची भूमिका घेत आहेत त्यांना समजावून सांगू. जर त्यांनी ऐकले नाही तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिस हस्तक्षेप करतील. 

लाडक्या बहिणीवर काहींनी टीका केली. निवडणुकीचे हे थोतांड आहे असे म्हटले गेले. त्यांना मी वेळच्या वेळी पैसे वेळेवर दिले आहेत. आम्ही योजना बंद करणार नाही.

जिथे मला मतदान जास्त तिथे स्वीकृत संचालक घेणार. काल कॅबिनेट मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी 500 कोटी दिले आहे. माझा 70-75 एकर ऊस असतो. तिथं मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर काम करणार. मी पुढच्या महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना घेऊन येणार आहे. 

माझी जमीन खाताळपट्टा आणि ढेकळवाडीत आहे. आधी शेतकऱ्यांचे भिजणे काढतो मग माझे भरणे काढतो. मी आधी शेतकरी यांचे भरणे काढतो. काही जण रिव्हॉल्व्हर दाखवतात. जर शेतकऱ्यांना रिव्हॉल्वर दाखवली तर जप्त करेने. 

तुम्ही मला खुश करा मी तुम्हाला खुश करेल. माझं पॅनेल निवडून द्या, माळेगावला 500 कोटी रुपये देतो. 

कारखान्यातील 60 हजार पोती भिजली असतील तर आता पॅनल मागे घेतो. जर ती भिजली नसतील तर सहकार महर्षी त्यांचे पॅनेल मागे घेणार का? आहे का हिंमत? काहीही थापा मारतात. उद्या सगळ्या उमेदवारांना बोलावणार आहे आणि उद्याच सगळ्यांचे राजीनामे घेणार आहे.

माळेगाव इतका भाव दुसऱ्या कारखान्याला दिला असता तर माझ्या समोर कुणी पॅनेल उभे केले नसते. ते म्हणतात माझं समजून उमजून घ्या. अरे त्यांच नका घेऊ, माझं समजून उमजून घ्या. वय झालं तर आशीर्वाद द्या. तुमच्या काळात काय झालं आठवा. 

त्यांनी जर कारखाना चांगला चालवला असता तर लोकांनी आम्हाला कशाला संधी दिली असती. माझ्या हातात सहकार, कृषी, एक्ससाईज खाते आहे. 

खराब तांदळापासून इथेनॉल तयार करण्याचा कारखाना माझ्या मुलाने काढला आहे. तिथं जाऊन बघा. तुमच्या काळात कोजनच्या युनिटचे 50 कोटी नुकसान झाले. अण्णा, काका याला जबाबदार कोण?

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
Uddhav Thackeray Vs Shah सत्ताधारी, विरोधकांची एकमेकांवर आरोपाची चिखलफेक, डायलॉगबाजी Special Report
Pune Crime Special Report पुण्यात दहावीतील मुलाची हत्या,  शाळकरी मुलाकडून वर्गमित्राचीच हत्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
IPL 2026 Auction Live: ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस! प्रशांत वीरवर CSKने उधळले 14.20 कोटी, रचला इतिहास, कोण कोणत्या संघात? जाणून घ्या सर्वकाही
ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस! प्रशांत वीरवर CSKने उधळले 14.20 कोटी, रचला इतिहास, कोण कोणत्या संघात? जाणून घ्या सर्वकाही
Latur Crime News: माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Embed widget