Amol Kolhe VS Adhalrao Patil : पुरावे द्या, मी लोकसभेतून माघार घेतो, अथवा तुम्ही निवडणुकीतून बाहेर पडा...; कोल्हेंना आढळरावांचं आव्हान
माझ्या कंपनीला घेऊन केलेल्या आरोपांचे आता पुरावे द्यावेत. मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो, अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावं, असं खुलं आव्हान शिवाजी आढळरावांनी कोल्हेंना दिलं आहे.
शिरुर, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी (Amol kolhe) माझ्या कंपनीला घेऊन केलेल्या आरोपांचे आता पुरावे द्यावेत. मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो, अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावं, असं खुलं आव्हान अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळरावांनी कोल्हेंना (Adhalrao Patil) दिलं आहे. आता कोल्हे हे आव्हान कसं पेलतात, हे त्यांच्या पुढच्या भूमिकेतून स्पष्ट होणार आहे.
कोल्हेंच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना आढळरावांनी आगपाखड ओखली. गेली तीन महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळं ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप कोल्हे करू लागलेत. दोनचं दिवसांपूर्वी जुन्नरमधील शरद पवारांच्या सभेत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला होता. काहींनी पंधरा वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास आहे, असा घणाघाती आरोप कोल्हेनी आढळरावांवर केला होता. याला प्रतिउत्तर देताना आढळरावांनी कोल्हेना थेट खुलं आव्हान दिलं आहे.
पुरावे द्या, मी माघार घेतो...
माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हेनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो अन्यथा कोल्हेनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं. असं आव्हान आढळरावांनी दिलं. आता कोल्हे पुरावे सादर करतात, केले तर आढळराव निवडणुकीतून माघार घेतात का? आणि कोल्हेंकडे पुरावे नसले तर ते निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडतात का? हे कोल्हेंच्या पुढच्या भूमिकेतून लवकरच स्पष्ट होईल.
आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंमध्ये 'तू तू मै मै' सुरुच!
आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंमध्ये 'तू तू मै मै' सुरुच असल्याचं दिसत आहे. त्यातच आधी कोल्हेंनी आढळराव पाटलांना डमी उमेदवार म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर मी दमी नाही तर डॅडी उमेदवार आहे, असं प्रत्युत्तर आढळराव पाटलांनी दिलं होतं. त्यासोबतच दोघेही प्रत्येक सभेत एकमेकांवर विविध मुद्द्यांवर टीका करताना दिसतात. आता कंपनीच्या प्रकरणात नेमकं काया उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
आईच्या योग्यतेवर अजितदादांचं भाष्य, रोहित पवारांचं जशास तसं उत्तर
माढ्यात नवा ट्विस्ट! अभिजित पाटील यांनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला धक्का