एक्स्प्लोर

रोहित पवारांना 'तो' व्हिडिओ कुणी पाठवला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्टच सांगितलं, आमदारांना टोलाही लगावला

संबंधित गावातील ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या तक्रारी होत्या, माझ्याजागी कुणीही असते तरी त्याच भावना असत्या.

अहिल्यानगर: महायुती सरकारमधील मंत्र्‍यांच्या वादग्रस्त वक्तव्याने गेल्या काही दिवसांत राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांच्या हाती आयतं कोलित देण्याचं काम मंत्र्यांकडून होत आहे. त्यातच, आमदार रोहित पवारांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणल्यानंतर पुन्हा मंत्री मेघना बोर्डीकर (Meghna bordikar) यांच्याकडून ग्रामसेवकाला धमकी दिल्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला. त्यावरुन, रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात शा‍ब्दिक वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. आता, अहिल्यानगर दौऱ्यावर आल्या असता मेघना बोर्डीकरांनी संबंधित व्हिडिओवर स्पष्टीकरण देत हा व्हिडिओ रोहित पवारांना (Rohit pawar) कुणी पाठवला, यावरही भाष्य केलं. तसेच, रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित गावातील ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या तक्रारी होत्या, माझ्याजागी कुणीही असते तरी त्याच भावना असत्या. मी घडलेल्या प्रकाराबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली, असे स्पष्टीकरण मंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला दिलेल्या धमकीवरुन व्हायरल व्हिडिओबाबत केले. तसेच, रोहित पवारांना तो व्हिडिओ कुणी पाठवला, याचीही माहितीही त्यांनी स्पष्टपणे दिली. सर्वच ग्रामसेवक तसे नाहीत, पण गावात एखाद्या नेत्याचा किती हस्तक्षेप असावा हे लोकांनी ठरवले पाहिजे. सरकारच्या योजना लोकांसाठी असतात. मात्र, खऱ्या गरजूंना योजना मिळत नसेल तर त्रागा होणारच. रोहित पवार अर्धवट माहिती पसरवतात, रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाली आहे, असा टोला मेघना बोर्डीकर यांनी लगावला आहे. 

व्हिडिओबाबत विजय भांबळेंकडे बोट

आमच्या मतदारसंघातले रोहित पवारांचे जुने मित्र अजितदादांकडे आले आहेत, त्यांनीच हा कार्यक्रम केलाय असे म्हणत बोर्डीकर यांनी संबंधित व्हिडिओ रोहित पवारांना कुणी पाठवला हेच नाव घेता सांगितले. त्यांनीच रोहित पवारांना अर्धवट माहिती पोहोचवली. रोहित पवारांना काही काम नसल्याने अर्धवट माहितीच्या आधारे दुसऱ्यांना दोष देत आहेत, असेही त्यांनी म्हटले. मेघना बोर्डीकर यांचा रोख अजित पवार गटाचे नेते विजय भांबळे यांच्याकडे असून भांबळे यांनीच रोहित पवारांना मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ दिल्याचे त्यांनी सूचवले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी देखील दिली प्रतिक्रिया

मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करु लागलो तर हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हायरल व्हिडिओवर दिली आहे. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात तर काही चुकीची असतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्री मेघना बोर्डीकर आणि संजय शिरसाट यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.  

हेही वाचा

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं

महत्त्वाच्या बातम्या

लोटसशिवाय 'ऑपरेशन टायगर' शक्य नाही, मुंबई महापालिकेत 'ऑपरेशन लोटस' राबवलं जाणार, भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
लोटसशिवाय 'ऑपरेशन टायगर' शक्य नाही, मुंबई महापालिकेत 'ऑपरेशन लोटस' राबवलं जाणार, भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
Naresh Mhaske : ठाकरेंचे उरलेले तीन खासदारही लवकरच फुटतील, संजय राऊत काँग्रेसचे 'दलाल'; नरेश मस्केंची टीका
ठाकरेंचे उरलेले तीन खासदारही लवकरच फुटतील, संजय राऊत काँग्रेसचे 'दलाल'; नरेश मस्केंची टीका
Operation Tiger : मुंबईतील खासदार फुटला, पदाधिकारी काय करणार? संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक
मुंबईतील खासदार फुटला, पदाधिकारी काय करणार? संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक
Shivsena Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'चा क्लायमॅक्स मुंबईत! जयपूरहून 6 बंडखोर खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार; शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा धमाका
'ऑपरेशन टायगर'चा क्लायमॅक्स मुंबईत! जयपूरहून 6 बंडखोर खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार; शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा धमाका

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
Sanjay Raut: आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate :सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
Shivsena Operation Tiger : बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
Embed widget