Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis: 'मिलिंद नार्वेकरांनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. मी त्यांना म्हणालो, उद्धवजी वेळ निघून गेली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडानंतर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्ही मु्ख्यमंत्री बना असा उद्धव ठाकरेंचा फोन आल्यााचा सनसनाटी गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र वेळ निघून गेली होती. 2022 सालाच्या सत्ता स्थापनेच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगितले.आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पार्टी घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळे नीट करु.
मिलींद नार्वेकरांनी फोन लावला आणि उद्धव ठाकरे म्हणाले...
'मिलिंद नार्वेकरांनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. मी त्यांना म्हणालो, उद्धवजी वेळ निघून गेली आहे. आता तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करु शकता. माझ्या पातळीवर हा निर्णय संपलेला आहे. आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बेईमानी करणार नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला की नाही, या विषयी मला कल्पना नाही', असे देखील देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.
एकनाथ शिंदेंनाही केली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडावेळी नेमकं काय घडलं होतं याचे गौप्यस्फोट होत आहे. दोनच दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंनी या संदर्भात खुलासा केला होता. एकानाथ शिंदे म्हणाले होते की, शिवसेना आमदार सुरतला गेल्यावर शिवसेनेत धांदल उडाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत फोन लावला. दिल्लीतील भाजप नेत्यांशी संवाद साधला. यांना कशाला घेता? आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफरच उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना दिली होती. तसेच वसईला चहा पिण्यासाठी टपरीवर थांबलो त्यावेळी देखील उद्धव ठाकरेंनी शिंदेंना फोन केला होता. परत या असे म्हणत ख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण, मी त्यांना म्हटलं आता खूप उशिर झाला आहे.
हे ही वाचा:
Uddhav Thackeray : गद्दारांचे दोन बापही महाराष्ट्राचे गद्दार, यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात