Amit Shah: शाहांनी विधानसभा निवडणुकीचा ठोकला शड्डू; म्हणाले 'राज्यात बहुमताचं सरकार अन् देशात आणखी ३० वर्षे राहणार'
Amit Shah: आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शाह हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसेच अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
पुणे: आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शाह (Amit Shah) हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसेच अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी बैठकात बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले, लोकसभा निवडणुकीची सर्व कसर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भरून काढा. आगामी निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल आणि राज्यात प्रंचड बहुमतात युतीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
बाजीराव पेशवा आणि बाळगंगाधर टिळक यांच्या या पुण्यनगरीमध्ये सांगतो आहे, आत्ता तर फक्त 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. पुढचे ३० वर्ष भाजपचे सरकार या देशात येईल. आपल्यातील आत्मविश्वासाला जागरूक करण्याची गरज आहे. आपल्यातील मतभेद दूर करण्याची गरज आहे. महान भारताची रचना ही केवळ भाजपचं करू शकते. याच आत्मविश्वासासह पुढे जायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशीतील गरीब नागरिकांना घरे दिली, शौचालये दिली, गॅस सिलिंडर दिले, वीज दिली. गरीबांना अन्नधान्य दिलं, ५ लाखापर्यंत विमा दिला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना, आणि लाडका भाऊ योजना देत आहेत. गरीब कल्याणांचं कोणताही काम काँग्रेस पक्ष करू शकत नाही किंवा त्यांचा कोणता मित्रपक्ष हे काम करू शकतो. गरिब कल्याणचं काम हे फक्त भाजपचं करू शकते, असं म्हणत अमित शाहांनी (Amit Shah) काँग्रेसवर हल्लाबोल करत पुढील 30 वर्षे भाजपची सत्ता देशात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शाहांचा हल्लाबोल
"भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं", असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला. पुण्यात (Pune) महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.