एक्स्प्लोर

Pune Crime news: कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप; 'तो' व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा...'

Pune Crime news: एका प्रकरणात तीन तरुणींना संशयिताच्या भूमिकेतून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. त्यांच्यासोबत वाईट वर्तणूक केल्याचा दावा एका व्हिडीओमधून करण्यात आला आहे.

पुणे: कोथरुड पोलीस ठाण्यात तिघी तरुणींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केला आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील एक विवाहित महिला सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात कोथरुडमध्ये राहणाऱ्या तीन मैत्रिणींकडे एक दिवसासाठी आली होती. संबंधित महिलेची मिसिंगची तक्रार संभाजीनगरमध्ये दाखल करण्यात आली होती. पोलीस तिचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुडपर्यंत आले.

कोथरुडमध्ये संबंधित महिलेला सापडल्यावर पोलिसांनी तिला राहण्यासाठी मदत करणाऱ्या तिघी तरुणींना संशयिताच्या भूमिकेतून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. पीडित मुलींच्या आरोपानुसार, पोलिसांनी त्यांना वाईट भाषेत बोलावलं, त्यांच्या कपड्यांवरून आक्षेप घेतले आणि जातीवाचक शब्द वापरून मारहाण केली. या घटनेबाबत कोथरुड पोलिसांनी मात्र आरोप फेटाळले असून, “तपासाच्या भाग म्हणून प्रश्न विचारण्यात आले. कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा अपमान झालेला नाही,” असं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, “पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला 'व्हॉट्सॲप'वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी.  या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी."

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला आली होती. ती तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगरमध्ये होती. पोलीस या संभाजी नगरच्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुडपर्यंत (Kothrud News) पोहोचले. त्यावेळी या संभाजीनगरच्या मुलीचं लोकेशन कोथरुडमध्ये आढळळं. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड रुममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Pune News)

कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस (Chhatrapati Sambhaji nagar news) ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कामटे यांनी या तिन्ही मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आहे. श्वेता एस या मुलीने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत हा सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितला आहे. पोलिसांनी या मुलींच्या चारित्र्याबद्दल अपमाजनक शब्द वापरले, तसेच तोकड्या कपड्यांवरुन वाईटसाईट बोलले, असा आरोप श्वेता एस हिने केला आहे. पीएसआय कामटे यांनी एका मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि चुकीचा स्पर्श केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तिन्ही मुली पुण्यात नोकरी करतात, कोथरुड परिसरात राहतात. पोलीस सगळे मिसिंग केसची चौकशी या मुलींकडे करत होते. त्यांना कोणत्याही पद्धतीची मारहाण झाली नाही. तपासाचा भाग म्हणून काही प्रश्न विचारल्याचं कोथरुड पोलिसांनी सांगितलं आहे.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...

व्हिडीओ

Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Embed widget