Pune Political News: देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे खासदार करा; ब्राह्मण महासंघाची मागणी
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली आहे.
Pune Political News: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे पुण्यातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुण्यात अखिल भारतीय महासंघ भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. 2024 मध्येही देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही त्यांनी स्षष्ट केलं आहे.
फडणवीस यांची निवड अत्यंत मोलाची असून त्यांनी दिल्लीतील राजकारणाची सुरुवात पुण्यातून करावी, अशी इच्छाही महासंघाने पत्रात व्यक्त केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे. फडणवीस पालकमंत्री झाल्यास जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, त्यामुळे ते जिल्ह्याच्या हिताचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र पालकमंत्र्यांचा निर्णय झालेला नाही. त्याचवेळी ब्राह्मण महासंघाने फडणवीस यांना पुण्याचे खासदार म्हणून पत्र दिल्याने फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. यावर भाजप नेते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे नेते आणि कार्यकर्ते उद्या भाजपनेते चंद्रकांत पाटील यांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेणार आहे. यावेळी ते वेगवेगळ्या मागण्या करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. यंदा पुण्यात संध्या ब्राह्मण महासंघाचे नेते चांगल्या प्रकारे सक्रिय झाल्याचं चित्र आहे. आता ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे नेमकी कोणती मागणी करतात याकडे पुण्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.
वंदे मातरमने मुस्लिमांचं काही नुकसान होत नाही; ब्राह्मण महासंघाचं मत
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या पुढे फोनवर बोलताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी याबाबतची घोषणा केली त्यानंतर अनेक स्तरावरुन या निर्णयाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. यात आता हिंदू महासंघाने देखील यात उडी घेतली आहे. या निर्णयाचं स्वागत करायला हवं, यावर उगाच टीका करु नका, अशी देखील भूमिका हिंदू महासंघानी व्यक्त केली आहे.
सगळ्या खात्यात हा निर्णय राबवल्या जाईल, असा निर्णय सुधीर मुनघंटीवार यांनी घ्यायला हवा. या बाबत एकाच मंत्र्याने निर्णय घेऊन चालणार नाही. तर केंद्रात देखील भाजपचं सरकार असल्याने त्यांनी देखील या निर्णयाचं स्वागत करायला हवं. जितेंद्र आव्हाडांनी यावर टीका केली कारण त्याच्या मतदार संघात सगळे मुस्लिम समाजाचे लोक राहतात. मात्र मुस्लिम समाजाच्या नागरीकांना याबाबत कोणताही आक्षेप नाही आहे. मात्र त्यांच्या नेत्यांचा या निर्णयाला आक्षेप असेल तर ते नेतृत्व टीकवण्यासाठी याबाबतचा आक्षेप घेत आहेत, असं मत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केलं आहे.