Ajit Pawar VS Sharad Pawar : शरद पवारांकडून सुनील शेळकेंवर दमदाटीचे आरोप; अजित पवारांकडून शरद पवारांना सडेतोड उत्तर
शरद पवारांकडून सुनील शेळकेंवर दमदाटीचे आरोप केले त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. कार्यक्रमाला नगण्य उपस्थिती असल्याने सुनील शेळकेंना टार्गेट केल्याचं ते म्हणाले आहेत.
पुणे : लोणावळ्यातील मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar On Sunil Shelke) आमदार सुनील शेळकेंवर कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याचे आरोप केले. त्यानंतर तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही, असंही शरद पवार म्हणाले. त्यानंतर मावळमधील राजकारण चांगलंच तापलं. त्यानंतर दमदाटी केलेल्याला समोर आणा, असं सुनील शेळकेंनी थेट शरद पवारांना खुलं आव्हानं दिलं. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. 'त्या कार्यक्रमानंतर मी सुनील शेळकेंना (Sunil shelke) फोनकरुन सगळं विचारलं मात्र त्यांनी कोणालाही दमदाटी केली नसल्याचं सांगितलं. शरद पवारांच्या लोणावळ्यातील कार्यक्रमाला नगण्य उपस्थिती असल्याने शरद पवारांनी शेळकेंना टार्गेट केल्याचं ते म्हणाले. आज पुण्यातील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन पार पडलं. यावेळी पुण्यातील नवीन टर्मिनलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. यावेळी माध्यामांशी बोलताना त्यांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलं.
पळवाट म्हणून शरद पवारांनी सुनील शेळकेंना टार्गेट केलं!
शरद पवारांनी आरोप केल्यानंतर मी सुनील शेळकेंसोबत लगेच संवाद साधला. त्यावर सुनील शेळके म्हणाले की, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलं आहे. पण काही मान्यवरांनी वक्तव्य केल्यानंतर त्याला आपण उत्तर दिलंच पाहिजे असं नाही आणि पण मी कोणालाही दम दिला नसल्याचं सुनील शेळकेंनी मला सांगितलं, असं अजित पवारांनी सांगितलं ते पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार एवढे का चिडले याचं कारण शोधून काढलं. लोणावळ्यात ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला नगण्य उपस्थिती होती. त्यानंतर पळवाट म्हणून शरद पवारांनी सुनील शेळकेंना टार्गेट केलं.
काय म्हणाले होते शरद पवार?
मला 'शरद पवार' म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी आमदार सुनील शेळकेंवर हल्लाबोल केला होता. लोणावळ्याच्या सभेत शरद पवार यांनी सुनिल शेळकेंवर आरोपही केले होते. शरद पवार म्हणाले होते की, सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर घणाघात केला होता.
इतर महत्वाची बातमी-