अजित दादांनी पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं; रोहत पवार म्हणतात, 'त्यांच्यावर महराष्ट्राची जबाबदारी'
Maharashtra Politics: अजित दादांनी पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं, यावरूनच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
मुंबई : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (Vasantdada Sugar Institute) वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडतेय आणि याच सभेला शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर येणार होते. मात्र, अखेर अजित पवारांनी ऐनवेळी या सभेला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अजित दादांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यावरूनच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित नेते आणि उद्योजक हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार होते. मात्र, आता अजित पवारांनी या सभेकडे पाठ फिरवली असल्याची माहिती मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देतांना रोहित पवार म्हणाले की,“ अजित पवार हे शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळल असतील तर तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत नसावे, देवेंद्र फडणवीस काम करत नसावे, ते राजकीयदृष्ट्या व्यस्त असतील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवारांवर आली असावी. त्यामुळे एकटे अजित पवार काम करत आहेत. कदाचित याच कामामुळे अजित पवारांना आजच्या सभेला उपस्थित राहता आले नसावे,” असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
अजित पवार सतत शरद पवारांसोबत स्टेजवर येणं टाळतायत...
मागील काही दिवसांपासून अजित पवार सातत्यानं शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नाट्य संमेलनासह अनेक कार्यक्रमांमधे अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत स्टेजवर येणं टाळलय. दरम्यान, आजच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेला पुन्हा हे दोन्ही नेते एकत्र येणार होते. मात्र, नेहमी प्रमाणे आज देखील अजित पवारांनी शरद पवारांसोव्त एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळले आहेत.
वयावरून टीका करणाऱ्या अजित पवारांवर टीका
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे शरद पवारांच्या वयावरून टीका करत आहे. तसेच रोहित पवारांच्या कमी वयावरून देखील त्यांनी टोला लगावला होता. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्तेसाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेले आहे. ते स्वतःसाठी तिथे गेले आहे. त्यामुळे तिथे जाताना जे वय लागतं ते वय त्यांच्याकडे आहे. सत्तेत जाण्यासाठी आणि मंत्री होण्यासाठी जे वय लागतं ते वय देखील त्यांच्याकडे आहे. यांचं वय जसं जसं वाढेल, तसं तसं त्यांच्यासाठी ते योग्य वय होत जाईल असा मला वाटते. त्यामुळे हे सोयीचे राजकारण आहे, सोयीचे भाषण आहे. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर यांचा वेळ कशात जातोय. त्यांनी घेतलेला निर्णय कार्यकर्ते आणि लोकांनाही पटत नसल्याचा त्यांना माहित आहे. ठाकरे गट आणि अजित पवार गटाला कुठेही जनमत मिळत नसल्याचे अनेक सर्वेमधून समोर आले आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: