एक्स्प्लोर
बारामतीची वाट लावणारा जन्माला यायचाय : अजित पवार

बारामती : बारामतीची वाट लावणारा जन्माला यायचाय, असे म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता महादेव जानकर यांच्यावर तोफ डागली आहे. जानकरांनी काही दिवसांपूर्वी भगवानगडावरील दसरा मेळाव्यातील सभेत अजित पवारांवर टीका केली होती. त्या टीकेचा खरपूस समाचार अजित पवारांनी बारामतीत घेतला. महादेव जानकर काय म्हणाले होते? “बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही.” असा घणाघात रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अजित पवारांवर केला होता. शिवाय, अजित पवारांबाबत अपशब्दही जानकरांनी काढला होता. दसरा मेळाव्यातील वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी जानकरांवर टीकेची झोड उठवली होती. महादेव जानकर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणीही विधानपरिषदेची विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
विश्व























