Bopdev Ghat Incident: आरोपीने पोलिसांना बोपदेव घाटातील दाखवलं घटनास्थळ; परिसरातून दांडके अन् कपडे जप्त, नेमकं काय-काय सापडलं?
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात ही घटना घडली ते ठिकाण आरोपीने पोलिसांना दाखवले. त्याचबरोबर तरूणीवर अत्याचार केलेले घटनास्थळ देखील आरोपीने दाखवले आहे.
पुणे: बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट समोर आली आहे. बोपदेव घाटात ही घटना घडली ते ठिकाण आरोपीने पोलिसांना दाखवले. त्याचबरोबर तरूणीवर अत्याचार केलेले घटनास्थळ देखील आरोपीने दाखवले आहे. या प्रकरणी धाक दाखवण्यासाठी आरोपीकडून वापरले गेलेले दांडके आणि कपडे जप्त करण्यात आले आहेत. अटकेत असलेल्या आरोपीने मुलगी आणि त्याच्या मित्राला धमकावण्यासाठी वापरलेले दांडके व त्याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. चंद्रकुमार कनोजिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अख्तर शेख याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याला अद्याप न्यायालयात हजर करण्यात आलेले नाही. पुणे पोलिसांकडून आणखी एका आरोपीचा शोध अद्याप ही सुरूच आहे. 3 ऑक्टोबरला बोपदेव घाटातील टेबल पॉइंट परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत, तर हा गुन्हा करण्यापुर्वी आरोपींना दारू प्यायली होती. गांजाचे सेवन केले होते, अशी माहिती समोर आली आहे.
मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला अन्...
बोपदेव घाटात गुन्हा करण्यापुर्वी आरोपींनी दारू आणि गांजाचे सेवन केल्याची माहिती आहे. तर त्यांनी या गुन्ह्या केल्यानंतरही आपले मोबाईल फोन देखील बंद करून ठेवले होते. आरोपींनी त्यांचे मोबाईलफोन फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. (Bopdev Ghat Incident)
गुन्हा केल्यानंतर पुन्हा तीन दिवस पुण्यात वास्तव्य
सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलीस सर्वत्र तपास करत होते. तर हा गुन्हा केल्यानंतर आरोपी तीन दिवस पुण्यात फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. 7 ऑक्टोबर ते तिघेजण भेटल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं आहे. त्यानंतर शेख नागपूरला गेला. तर त्याचा दुसरा साथीदार चंद्रकुमार कनोजियाला 11 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कनोजिया याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोयत्याच्या धाक दाखवून तिघांनी केला तरुणीवर लैंगिक अत्याचार
घटनेतील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी बोपदेव घाटात गुरुवारी (ता. 3) रात्री दहाच्या सुमारास दारू प्यायली,गाजांचे सेवन केलं, . त्यानंतर त्यांनी घाटात बसलेल्या तरुण-तरुणीला बांबूच्या दांडक्याने मारहाण केली. कोयत्याच्या धाक दाखवून तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून बोपदेव घाटातून वरती गेले. पोलिसांना आपण सापडू नये यासाठी मुख्य रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला. सुमारे 20 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 80 किलोमीटरचा प्रवास केला. सासवड परिसरात एका पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात आरोपींचे चेहरे स्पष्ट आढळून आले होते. तसेच, एका दारू विक्री दुकानात दारू पित असल्याचे दिसून आले.