एक्स्प्लोर

Mumbai - Pune Old Highway : जुना मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; खासगी बसने दुचाकीवरील पती-पत्नीला चिरडलं; पत्नीचा जागीच मृत्यू!

जुना मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील खंडाळा येथे भीषण अपघात झाला आहे.एका अवघड वळणावर पती पत्नी मोटारसायकलवरून नवी मुंबई येथून पुण्याच्या दिशेला जात असताना खासगी बस खाली येऊन अपघात झाला. 

पुणे : जुना मुंबई पुणे महामार्गावर अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच एका भीषण अपघातामुळे जुना पुणे मुंबई महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जुना मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील खंडाळा येथे भीषण अपघात झाला आहे.एका अवघड वळणावर पती पत्नी मोटारसायकलवरून नवी मुंबई येथून पुण्याच्या दिशेला जात असताना खासगी बस खाली येऊन अपघात झाला. 

या अपघातात सुरेखा आनंद सणस ही महिला जागीच ठार झाली असून पती आनंद सहदेव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार झारा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय .घटनास्थळी लोणावळा शहर पोलिसांनी जखमी आनंद सणस यांना रुग्णालयात दाखल केलं असून सुरेखा सणस यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केलाय. तर बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहे. मुंबईहून पुण्याकडे दाम्पत्य निघालं होतं. मात्र मध्येच खासगी बसने  दोघांना चिऱडलं. भरधाव खासगी बस थेट दोघांच्या दोघांच्या अंगावर घालती आणि पुण्याकडे निघालेल्या दाम्पत्याचा काळाने घात केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. 

दोन दिवसांपूर्वीदेखील भीषण अपघात

दोन दिवसांपूर्वीदेखील जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला होता. यात दोन महिलांचा मृत्यू झाला होता आणि त्यासोबतच चार महिला जखमीदेखील झाल्या होत्या. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार पलटी होऊन अपघात झाला होता. हा अपघात  कामशेत जवळ नायगाव येथे घडला.सीताबाई तुकाराम लालगुडे (वय 58, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ), सिद्धी संतोष तिकोने (वय 18, रा. पाटण, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. रिद्धी संतोष तिकोने (वय 14, रा. पाटण, ता. मावळ), प्रियंका संग्राम भानुसघरे, सुभद्रा किसन भानुसगरे, लता किसन पिंजन या महिला जखमी झाल्या होत्या. प्रकरणी ऋषीनाथ तुकाराम लालगुडे (वय 43, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक सुमित गुलाब पिंजन (वय 23, रा. कीनई, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाची बातमी-

कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस

Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.

Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget