एक्स्प्लोर

RSS Fake facebook Page: 'RSS संघराज्य' नावाने सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट करणं आलं अंगलट; खातेधारकावर पुण्यात गुन्हा दाखल

RSS संघराज या नावाच्या  फेसबुक पेजच्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी या पेजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

RSS Fake facebook Page: RSS संघराज या नावाच्या युट्यूब (Youtube) खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी या पेजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शरद पवार आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर विचित्र कमेंट केल्याचा आरोप या पेजवर करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या युट्यूब अकाऊंटवर आक्षेप घेतला होता. या खातेधारकावर कारवाई करण्याची मागणीदेखील केली होती.

नक्की काय  होतं प्रकरण?
`RSS संघराज` नावाचं फेसबुक पेज आणि इतर संबंधीत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मव्दारे  देशभरातील नागरिकांच्या मनात श्रद्धास्थानी असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली जाते आहे. जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासंबंधाने पोलिस, सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार आणि आपली सर्वांची श्रद्धा असलेल्या महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली होती.पोलीस व सायबर क्राइम विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिस यंत्रणांनी तपास सुरू केला होता.

बाबासाहेब पुरंदरे आणि शरद पवार यांच्यावरही हीन दर्जाची कमेंट
 रा. स्व. संघ आणि संघ विचारांनी चालणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याच्या हेतूने फेसबुकवर `RSS संघराज नामक फेसबुक पेज व इतर संबंधीत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मव्दारे  देशभरातील नागरिकांच्या मनात श्रद्धास्थानी असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली जाते आहे. त्यासोबतच कै. बाबासाहेब पुरंदरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरही हीन दर्जाची कमेंट करत खोटा आणि अपप्रचार करणारा संघाची बदनामी करणारा मजकूर व्हायरल केला जातो आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असंही श्री. करपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले होते. `RSS संघराज` हे अकाऊंट आमचं नाही आहे आणि असा कोणताही प्रचार किंवा माहिती आम्ही प्रसारीत केली नाही आहे. आमच्यावर रचलेला हा कट आहे. हेतूने जाणीवपूर्वक असा मजकूर पसरवला जातो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  05 PM TOP Headlines 05 PM 21 September 2024Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उद्याच घेण्याचे कोर्टाचे निर्देशSanjay Raut On Vidhan Sabha : 4 दिवस सलग मविआच्या जागावाटपाबाबत चर्चा; राऊतांसोबत Exclusive बातचीतManoj Jarange VS Laxman Hake : जालन्यात तणाव, आरोपांच्या फैरी;'जालन्यातील परिस्थितीला शिंदे जबाबदार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
Israel Mossad Agents : फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
Embed widget