औंधमध्ये दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल
औंध परिसरात दाम्पत्याला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![औंधमध्ये दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल A case has been registered against former MLA Harshvardhan Jadhav for assaulting a couple in Aundh औंधमध्ये दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/15221033/harshavardhan-jadhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : औंध परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता चतुर:श्रुंगी पोलिसांनी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांना पोलीस स्टेशनला आणून ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याबाबत अमन अजय चड्डा (वय 28, रा. भाऊ पाटील रोड, पुणे. आयटी पार्क समोर, बापोडी, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हर्षवर्धन रायभान जाधव (वय 43, रा. बालेवाडी, पुणे) आणि इषा बालाकांत झा (वय 37, रा. वाकड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार चड्डा यांचे आई आणि वडील हे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्या रस्त्यावरून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी हर्षवर्धन यांनी चारचाकीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे अपघात झाला.
त्याबाबत चड्डा यांच्या वडिलांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. चड्डा यांच्या वडिलांनी त्यांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे हे देखील जाधव यांना सांगितले. त्यानंतर देखील आरोपींनी संगनमत करून चड्डा यांच्या आई आणि वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. या प्रकरणी चड्डा यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या : Harshvardhan Jadhav | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
रावसाहेब दानवेंविरोधात हर्षवर्धन जाधव आक्रमक, औरंगाबाद शहरात पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)