एक्स्प्लोर
Advertisement
Harshvardhan Jadhav | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.एक व्हिडीओ संदेश जारी करुन हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे.
औरंगाबाद : राज्याच्या राजकारणातलं चर्चेत असणारं नाव म्हणजे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. त्यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एक व्हिडीओ संदेश जारी करुन त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. नुकतंच त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं जाधव यांनी म्हटलंय.
सासरे रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरुन मुलावर अॅट्रॉसिटी गुन्हा; हर्षवर्धन जाधवांच्या आईचा आरोप
याबाबत आपले जे काही प्रश्न असतील ते आपण संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या पण याचा अर्थ असा नाही की काही वेगळ्या गोष्टी घडत असतील. मी संजना यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायबान जाधव यांच्या आशिर्वादाने आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात त्या निश्चित उत्तुंग भरारी मारतील, असंही त्यांनी म्हटलंय.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजनांचा मनसेमध्ये प्रवेश
आपण सर्वांनी इथून पुढं राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क करावा. मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, असं देखील हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी मनसे मध्ये प्रवेश केला होता. एकदा मनसे तर एकदा शिवसेनेकडून कन्नड मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसंच लोकसभा निवडणुकीत देखील ते औरंगाबाद लोकसभा क्षेत्रातून मैदानात होते. तिथंही त्यांचा पराभव झाला होता मात्र त्यांना 2 लाख 73 हजार 237 मतं मिळाली होती.
हर्षवर्धन जाधव हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळं चर्चेत असतात. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. 'एका नव्या डॅशिंग भूमिकेत हर्षवर्धन जाधव दिसेल. गेल्या काही वर्षांमध्ये मी थोडा भटकलो होतो, काही गैरसमज झाले होते, त्यातून आता माझी घरवापसी झाली आहे' असं ते म्हणाले होते.
VIDEO | निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाले हर्षवर्धन जाधव
" आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल -हर्षवर्धन जाधव "
-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement