Pune Crime News : 'ते' 500 जणं पुणे पोलिसांचं पुढचं टार्गेट; 50 महिलांचा समावेश
पुणे शहरातील 500 ड्रग्ज ‘पेडलर’ पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. पुण्यात ड्रग्सची खरेदी विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे.
पुणे : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून ड्रग्स (Pune Crime News) विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच 4000 कोटींचं ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी (Pune Police)शहरातील अवैध धंद्यांना आळा बसवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्यातच आता पुणे शहरातील 500 ड्रग्ज ‘पेडलर’ पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. पुण्यात ड्रग्सची खरेदी विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे.
पुणे पोलिसांनी गेल्या तीन वर्षातील ‘ड्रग्ज पेडलर’ (ग्राहकांना किरकोळ स्वरूपात ड्रग्ज पुरवणारे) शोधले असून ते पेडलर आता रडारवर घेतले आहेत. पुणे पोलिसांनी मागील 3 वर्षात केलेल्या कारवाईत तब्बल 50 महिलांचा समावेश असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे. या महिलांकडून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. या कालावधीत 30 परदेशी नागरिकांना देखील पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर देखील पोलीस नजर ठेवून आहेत. या पेडलरांना ड्रग्ज कोठून येतो याची साखळी शोधत ती पुर्णपणे उद्धस्थ करण्याचे काम गुन्हे शाखेने हाती घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून आत्तापर्यंत अशी 535 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे.
सराईत गुन्हेगाराची आणि गुन्ह्यांची यादी तयार
पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच काही दिवसांच ही गुन्हेगारी रोखण्यासाठी चंग बांधला आहे. त्यातच पुण्यातील कुख्यात गुंड आणि गुन्हेगारांना बोलवून त्यांची परेड काढली. त्यानंतर ड्रग्स तस्करांना बोलवून त्यांना सज्जड दम दिला. कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा विचार केला तर याद राखा, अशा शब्दांत त्यांना दम दिला. त्यानंतर सोशल मीडियावरुन गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स पोस्ट करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या. त्यानंतर आता पिस्तूल धारकांवर पुणे पोलिसांनी नजर असणार आहे. या सगळ्या गुन्हेगाराची यादी तयार केली आहे. त्यांना बोलवून दम दिला जण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे.
इतर महत्वाची बातमी-